Mumbai Indians record IPL Qualifier 2 : मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक, ज्यांनी पाच वेळा जेतेपद जिंकले आहे. पण या यशाच्या गाथेमागे एक असा आकडा आहे, जो चाहत्यांना कायम खटकत आला आहे. आणि तो म्हणजे एलिमिनेटर नंतर कधीही क्वालिफायर 2 जिंकता न आल्याचा इतिहास. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चार वेळा क्वालिफायर 2 खेळला आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एलिमिनेटर जिंकल्यानंतर जेव्हा जेव्हा संघ क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला आहे, तेव्हा तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्ससाठी हा विक्रम खूप त्रासदायक आहे.
रेकॉर्डमुळे पांड्याची धाकधूक वाढली
मुंबई इंडियन्स संघाने 2011 च्या आयपीएल हंगामात पहिल्यांदाच क्वालिफायर-2 सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांना आरसीबी संघाविरुद्ध 43 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, 2013 च्या हंगामात, मुंबई इंडियन्स संघाने क्वालिफायर-2 सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव केला आणि नंतर अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 23 धावांनी पराभव करून ट्रॉफी जिंकली.
2017 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सने पराभव केला आणि त्यानंतर अंतिम सामन्यात रायझिंग पुणे सुपर जायंट्सचा एका धावेने पराभव करून विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने शेवटचा क्वालिफायर-2 सामना 2023 च्या आयपीएल हंगामात खेळला होता, ज्यामध्ये त्यांना गुजरात टायटन्सकडून 62 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
फायनलचे स्वप्न भंगणार?
मुंबई इंडियन्स पहिल्यांदा आयपीएल फायनमध्ये 2010 ला पोहोचली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वात मुंबई गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती. मात्र, चेन्नई सुपर किंग्जनं त्यांना अंतिम फेरीत पराभूत केलं. मुंबई इंडियन्सनं 2011, 2012, 2014 आणि 2023 मध्ये प्लेऑफमध्ये धडक दिली होती. मात्र, ज्यावेळी मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असते. तेव्हा मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळालं नव्हतं.
मुंबई इंडियन्सचा क्वालिफायर 2 मध्ये ट्रॅक रेकॉर्ड
2011 मध्ये मुंबई इंडियन्सनं एलिमिनेटरमध्ये क्वालिफायर दोनमध्ये धडक दिली होती, त्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला.2012 मध्ये मुंबई इंडियन्सचा एलिमिनेटरमध्ये पराभव झाला होता. 2014 मध्ये मुंबई इंडियन्स एलिमिनेटरमध्ये पराभूत झाली.2023 मध्ये मुंबई इंडियन्स एलिमिनेटर मॅच जिंकली मात्र क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झाली होती.
हे ही वाचा -