Mumbai Indians IPL 2025: आयपीएल प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांचे शेवटचे कार्ड खेळले आहे. आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने विल जॅक्स, कॉर्बिन बॉश आणि रायन रिकेलटन यांच्या जागी जॉनी बेअरस्टो, चारिथ असलंका आणि रिचर्ड ग्लीसन यांची निवड केली आहे.

Continues below advertisement






इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जॉनी बेअरस्टो हा 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होता. बेअरस्टोने इंग्लंडसाठी एकूण 287 सामने खेळले आहेत. जॉनी बेअरस्टो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज सारख्या संघांचाही भाग राहिला आहे. तर चारिथ असलंका सध्या एकदिवसीय आणि टी-20 स्वरूपात श्रीलंकेचा कर्णधार आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 134 वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. रिचर्ड ग्लीसन याने इंग्लंडसाठी सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो.






मुंबईने एकाचवेळी 3 खेळाडू का बदलले?


विल जॅक्स, कॉर्बिन बॉश आणि रायन रिकेलटन हे आयपीएलमधील लीग फेरीनंतर त्यांच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार आहेत. कॉर्बिन बॉश आणि रायन रिकेलटन हे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग आहेत जे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहेत. हा सामना 11 जूनपासून लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.


कोणाला किती पैसे मिळतील?


विल जॅक्सची जागा इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो घेईल, ज्याची किंमत 5.25 कोटी रुपये असेल. रायन रिकेलटनच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला 1 कोटी रुपयांना राखीव ठेवण्यात आले आहे. 75 लाख रुपयांना कॉर्बिन बॉशची जागा चारिथ अस्लंका घेईल. जर मुंबई इंडियन्स पात्र ठरले तर प्लेऑफ फेरीतूनच बदली खेळाडू उपलब्ध होतील.


संबंधित बातमी:


Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले, काय घडलं?, VIDEO


Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: विकेट घेताच नडतो, सगळ्यांना भिडत सुटतो; दिग्वेश राठीला आतापर्यंत कोणालाही न मिळालेली शिक्षा सुनावली