GT vs MI, Top 10 Key Points : रोमांचक सामन्यात मुंबईने गुजरातवर पाच धावांनी विजय मिळवलाय. अखेरच्या षटकात डॅनिअल सॅम्सने भेदक मारा करत सामना फिरवला. मुंबईने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 172 धावांपर्यंत मजल मारु शकला. शुभमन गिल-वृद्धीमान साहा यांची वादळी अर्धशतकं गुजरातला विजय मिळवून देऊ शकली नाहीत. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा दुसरा विजय होय. आज झालेल्या रोमांचक सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईच्या संघात एक बदल -
गुजरातच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आलाय. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आलाय. मुंबईने ह्रतिक शौकीनच्या जागी एम. अश्विनला स्थान दिलेय.. मुंबईच्या संघात आजही अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची वादळी सुरुवात त्यानंतर टीम डेविडच्या फिनिशिंग टचच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या.
रोहित शर्मा 43, ईशान किशन 45 आणि टीम डेविड 44 धावांची खेळी केली.
यंदाच्या आयपीएलमध्ये फ्लॉफ गेलेल्या रोहित शर्माने गुजरातविरोधात तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सहा षटकार 61 धावा चोपल्या. रोहित शर्माने 29 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्माने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावांची सलामी दिली.
अखेरच्या दोन षटकार टीम डेविडने विस्फोटक फलंदाजी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. टीम डेविडने 21 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान डेविडने चार षटकार आणि दोन चौकार लगावले.
गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय अल्झारी जोसेफ, लॉकी फर्गुसन, प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
मुंबईने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाने दमदार सुरुवात केली. सलामी फलंदाज शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी वादळी खेळी केली. 12 षटकांत 106 धावांची सलामी दिली. शुभमन गिलने 36 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तर वृद्धीमान साहाने 40 चेंडूत 55 धावांची खेळी केली.
हार्दिक पांड्या 24 आणि साई सुदर्शन 14 धावा काढून बाद झाले. त्यानंतर डेविड मिलर आणि राहुल तेवातिया यांना गुजरातला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धावांचा पाठलाग करताना गुजरातचा पहिल्यांदाच पराभव झाला. मुंबईकडून एम अश्विनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर पोलार्डला एक विकेट मिळाली. डॅनिअल सॅम्सने अखेरच्या षटकात फक्त तीन धावा देत सामना फिरवला.