Arjun Tendulkar Viral Video:  लखनौ आणि मुंबई यांच्यात इकाना स्टेडिअमवर आज सामना रंगणार आहे. प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी हा सामना निर्णायक आहे. पण या सामन्यापूर्वी अर्जुन तेंडुलकरबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावल्याचे समोर आलेय. अर्जुन तेंडुलकर याने स्वत: ही माहिती दिली. लखनौ सुपर जायंट्सने हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये अर्जुन तेंडुलकर त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगतोय. 


लखनौ सुपरजायंट्सने ट्वीटर खात्यावरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, अर्जुन स्वत:च कुत्रा चावल्याची माहिती देत आहे. अर्जुन आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटला. युद्धवीर आणि मोहसिन खान यांना अर्जुन भेटला. त्यावेळी त्यांना अरे कुत्रा चावला.. अशी माहिती युद्धवीरला दिली. तो म्हणाला की, 'अरे  माझ्या हाताच्या बोटाला कुत्रा चावलाय.' त्याशिवाय तो हाताची जखमही दाखवत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झालाय. 






दरम्यान, दोन वर्ष बेंचवर बसल्यानंतर यंदा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. अर्जुन तेंडुलकर याने चार सामन्यात तीन विकेट घेतल्या. गेल्या काही सामन्यापासून अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नाहीये. मुंबईला आज लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळाणार आहे. प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने हा सामना मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात अर्जुनला संधी मिळणार का ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 


हेड टू हेड 


आजचा सामना लखनौ सुपर जायंट्सचं होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर होणार आहे. लखनौचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 सामने गमावले आहेत, 1 सामना अनिर्णित राहिला आहे, ज्यामुळे त्यांचे 13 गुण आहेत. आणि लखनौच्या वर म्हणजे, मुंबई इंडियन्स आहे, ज्यांनी 12 सामन्यांत 7 सामने जिंकले आहेत, 5 सामने गमावले आहेत आणि 14 गुण आहेत. जर लखनौनं मुंबईला पराभूत केलं तर त्यांचे 15 गुण होतील आणि ते तिसऱ्या क्रमांकावर येतील. पण जर मुंबई जिंकली तर त्यांचे 16 गुण होतील आणि ते चेन्नईला तिसर्‍या स्थानावर नेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. 


लखनौमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार 


लखनौच्या एकना स्टेडियमवर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत फक्त मुंबईतच सामने झाले आहेत. अशा स्थितीत आज लखनौला घरच्या मैदानाचा फायदा घेता येईल. लखनौनं आजचा सामना गमावला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्याचवेळी सामना गमावल्यानंतरही मुंबईला संधी असेल. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.