IPL 2022, Mumbai Indians : आयपीएलमधील सर्वात यशस्वी राहिलेल्या मुंबई इंडियन्स संघाची यंदाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा तीन गड्यांनी पराभव केला. मुंबईचा यंदाच्या हंगमात हा सलग सातवा पराभव आहे. या पराभवासह मुंबईचं यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आतापर्यंत मुंबईची इतकी बिकट अवस्था कधीही झाली नव्हती. आयपीएलच्या इतिहासात पहिले सात सामने गमावण्याचा लाजीरवाणा पराक्रम मुंबईने केला आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाने आयपीएलमध्ये सुरुवातीचे सात सामने गमावले नाहीत.  पाच वेळच्या विजेत्या मुंबईला सात सामन्यानंतरही योग्य असं संतुलन मिळालेलं नाही. याचा फटका मुंबईला आतापर्यंत बसला आहे. चेन्नईविरोधातही मुंबईला संघाचं संतुलन ठेवता आलं नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.  


यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ सर्वच स्थरावर अपयशी ठरला आहे. रोहित शर्मा, ईशान किशन, पोलार्ड, बुमराह यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच मुंबईचे आयपीएल स्पर्धेतील जवळपास आव्हान संपुष्टात आलेय. मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फॉर्म होय. या दोन्ही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15 कोटींपेक्षा जास्त रुपयांना खरेदी केलेल्या ईशान किशानला कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. ईशान किशन संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या दोन सामन्यात ईशान किशनने दमदार खेळी केली, पण त्यानंतर बॅट शांतच राहिली. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान किशन आणि रोहित शर्माला मोठी सलामी देण्यात अपयश आले आहे. रोहित शर्माने 19 च्या सरासरी फक्त 114 धावा केल्या आहेत.  सात डावात रोहित शर्माने 41, 10, 3, 26, 28, 6, 0 इतक्या धावा केल्या आहेत. रोहित आणि ईशान किशान यांचा फॉर्म ईशान किशनसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 


मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी - 
27 मार्च - दिल्लीकडून चार विकेटनं पराभव
2 एप्रिल - राजस्थानचा मुंबईवर 23 धावांनी विजय
6 एप्रिल - कोलकात्याच्या मुंबईवर 5 विकेटनं विजय
9 एप्रिल - आरसबीचा मुंबईवर सात विकेटनं विजय
13 एप्रिल - पंजाबकडून मुंबईचा 12 धावांनी पराभव
16 एप्रिल - लखनौचा मुंबईवर 18 धावांनी पराभव
21 एप्रिल - चेन्नईचा मुंबईवर तीन विकेटनं विजय