MSK Prasad on World Cup selection : टी 20 वर्ल्डकप यंदा ऑस्ट्रेलियात होणार आहे. युएईमध्ये विश्वचषकात झालेल्या चुका सुधारुन भारतीय संघ नव्या दमाने सामील होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही नवीन खेळाडूंची संघात एन्ट्री होऊ शकते. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर काही खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळू शकते. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहे. भारतीय संघाचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. त्यांच्यामध्ये टी 20 वर्ल्डकपच्या आधी दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या टी 20 मालिकेत दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि राहुल तेवतिया यांना संधी मिळायला हवी. 

 भारतायी संघाचे माजी मुख्य निवडकर्ते एमएस के प्रसाद म्हणाले की, टी 20 विश्वचषकाआधी दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशी होणाऱ्या टी 20 मालिकेत दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि राहुल तेवातिया यांना संधी द्यायला हवी. फिनिशरच्या भूमिकाबाबत बोलताना ते म्हणाले की, हार्दिक पांड्या, जाडेजा, कार्तिक आणि राहुल तेवातिया ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावू शकतात. कार्तिकने निदाहास चषकात दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्या गुजरातकडून तुफान कामगिरी करत आहे. तो चार क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकतो. तसेच महत्वाचे म्हणजे काही षटके गोलंदाजीही करु शकतो.  

 भारतीय संघात फक्त फलंदाजीवर संधी मिळू शकत नाही. हार्दिक गोलंदाजी करतो. त्याशिवाय कार्तिक विकेटकिपर म्हणून काम पाहू शकतो.त्याशिवाय तेवातियाही चांगली गोलंदाजी करतोय. त्यामुळे या तिघांची भारतीय संघात निवड होऊ शकते, असे प्रसाद म्हणाले. दरम्यान, युएईमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर हार्दिक पांड्या भारतीय संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला संघातील जागा गमावावी लागली होती. तो आता पुनरागमन करु शकतो. 

तेवातियावर बोलताना प्रसाद म्हणाले की, राहुल तेवातियाने आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केलेय. पण ऑस्ट्रेलियात त्याला अशी कामगिरी करता येईल.. याबाबत शंका आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये गोलंदाजीचा अतिरिक्त बाऊन्स मिळतो. त्याशिवाय तेथील मैदानेही मोठी आहेत.  

IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणार
भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं वेळापत्रक 

क्रमांक

 

 

दिवस

तारीख

सामना

ठिकाण

1

गुरुवार

9 जून

1st T20I

दिल्ली

2

रविवार

12 जून

2nd T20I

कटक

3

मंगळवार

14 जून

3rd T20I

वायजाग

4

शुक्रवार

17 जून

4th T20I

राजकोट

5

रविवार

19 जून

5th T20I

बेंगलरु