MI vs KKR IPL 2022 : आयपीएलचा 15 वा हंगाम जसा उत्तरार्धाकडे झुकला तसा रोमांच आणखी वाढत चाललाय. यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या चार संघाची नावे समोर आलेली नाहीत. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपलेय...पण मुंबईचा संघ उर्वरित सामने जिंकून प्रतिस्पर्धी संघाची चिंता वाढवू शकतो. आज मुंबईचा सामना कोलकात्याशी होणार आहे. या सामन्यावर चेन्नईचे खेळाडूही लक्ष ठेवून असणार आहेत. कारण, यांच्यातील विजयावरही चेन्नईच्या प्लेऑफमधील आशा जिवंत राहणार आहे. 


मुंबई आणि कोलकाता यांच्यात डी वाय पाटील स्टेडिअमवर सामना होणार आहे. या सामन्यात मुंबईचा विजय चेन्नईच्या पथ्यावर पडणार आहे. मुंबईविरोधात पराभव झाल्यास कोलकात्याचं प्लेऑपमधील आव्हान संपुष्टात येणार आहे. तसेच प्लेऑफमध्ये पोहचण्याची  चेन्नईची संधी आणखी वाढणार आहे. त्यामुळे मुंबईचा विजय चेन्नईसाठी फायद्याचा ठरणार आहे. 


चेन्नईच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी स्वत: सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तसेच इतर संघाच्या पराभव आणि विजयावर अवलंबून राहावे लागणार आहे. यातील एक सामना मुंबई आणि कोलकाता यांच्यातील आहे... मुंबईने कोलकात्याचा पराभव केल्यास चेन्नईला फायदा होईल. 


गुणतालिकेत मुंबईचा संघ आठव्या क्रमांकावर आहे तर कोलकाता संघ नवव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ तळाशी आहे. अशात मुंबईने आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास कोलकाताचा संघ चेन्नईच्या पुढे जाऊ शकणार नाही. तसेच त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.  चेन्नईचे चाहते कोलकात्याच्या पराभवासह... आरसीबी, दिल्ली आणि हैदराबादच्या पराभवासाठी प्रथना करत असेतील. इतर संघाच्या जय - पराजयाशिवाय चेन्नईला उर्वरित सामन्यात मोठा विजय मिळवावा लागेल. 


गुजरात-लखनौ प्लेऑफसाठी पात्र - 
हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जातोय. दोन्ही संघाने 8 सामने जिंकले आहे. लखनौ आणि गुजरातचे प्रत्येकी 16-16 गुण झाले आहेत. दोन्ही नव्या संघाची कामगिरी दर्जेदार आहे, या दोन्ही संघाचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जातोय. गुणतालिकेत राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौने 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. गुजरातच्या संघानेही 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. नेटरनरेटच्या आधारावर लखनौचा संघ अव्वल स्थानावर आहे. राजस्थानचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान संघाने 11 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. सध्या लखनौ, गुजरात, राजस्थान आमि आरसीबी हे चार संघ गुणतालिकेत अव्वल चार क्रमांकावर आहेत. तर मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्ली, हैदराबाद, पंजाब यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईलाही संधी आहे, मात्र त्यांना इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे.