MS Dhoni CSK Vs DC: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 31 मार्च रोजी सामना झाला. दिल्लीने प्रथम खेळताना 191 धावा केल्या होत्या, पण चेन्नईला 20 षटकांत केवळ 171 धावा करता आल्या आणि 20 धावांनी सामना गमवावा लागला.
चेन्नईचा पराभव जरी झाला, मात्र चाहते एमएस धोनीची (MS Dhoni) खेळी पाहून खूप आनंदी आहेत. धोनीने फलंदाजीसाठी येताच पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. धोनीने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावांची नाबाद खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
आयपीएल 2024 च्या हंगामात धोनीची फलंदाजी पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. धोनीची ही आक्रमक खेळी पाहून चाहते काय म्हणतायत, जाणून घ्या...
चेन्नईचा पराभव-
आयपीएल 2024 च्या 13व्या क्रमांकाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 191/5 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने संघाकडून सर्वात मोठी 52 धावांची खेळी खेळली. याशिवाय कर्णधार ऋषभ पंतने 51 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 6 बाद 171 धावांपर्यंतच मजल मारता आली. रहाणेने संघासाठी 45 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय आठव्या क्रमांकावर उतरलेल्या धोनीने चाहत्यांची मने जिंकली.
संबंधित बातम्या:
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos