SRH vs DC, IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघावर विजय मिळवला. दिल्लीचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय आहे. नाणेफेक जिंकून दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघाने हैदराबादला 145 धावाचं आव्हानं दिलं. पण हैदराबाद संघ 20 षटकात फक्त 137 धावांपर्यंतच मलज मारू शकला. दिल्ली कॅपिटल्स संघाने हा सामना सात धावांनी जिंकला. या दिल्लीकडून मनिष पांडे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 34 धांवाची सर्वाधिक खेळी केली. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) 21 धावांवर बाद झाला. 


डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम 


वॉर्नरने 20 चेंडूत 21 धावांची छोटी खेळी केली. मात्र, या छोट्या खेळीसह त्याने आयपीएलमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये एकही षटकार न ठोकता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये एकही षटकार न ठोकता सर्वाधिक धावा जमवल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात वॉर्नरने षटकार न ठोकता सर्वात जास्त धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये एकूण 306 धावा ठोकल्या आहेत.


वॉर्नरचा पहिला षटकार सातव्या सामन्यात


आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर पहिल्या सहा सामन्यांमध्ये एकही षटकार ठोकला नव्हता. आयपीएल 2023 मध्ये डेव्हिड वॉर्नरने पहिला षटकार सातव्या सामन्यात ठोकला. हा षटकार ठोकण्याआधी डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या मोसमात 290 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या एका मोसमात एकही षटकर न ठोकता सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्यांने यंदाच्या आयपीएलमधील पहिला षटकार हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ठोकला. त्याआधी त्यानं एकही षटकार ने ठोकता धावा केल्या होत्या.


षटकार न ठोकता सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


मनदीप सिंहने आयपीएल 2013 मध्ये पंजाब किंग्स संघासाठी खेळताना एकही षटकार न ठोकता 260 धावा काढल्या होत्या. 260 धावांचा डोंगर रचल्यावर त्याने पहिला षटकार ठोकला होता. तर 2009 च्या आयपीएल हंगामात मिथुन मंहानने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळताना 157 धावा षटकार न ठोकता केल्य होत्या. त्याने एकही षटकर ठोकला नव्हता. त्याशिवाय नितिन सैनी ने 2012 मध्ये पंजाबसाठी खेळताना षटकार न ठोकता 140 धावा केल्या होत्या. तसेच पुजाराने 2014 मध्ये पंजाब संघासाठी खेळताना 125 धावा विना षटकार ठोकता जमवल्या होत्या. 


DC vs SRH : दिल्लीकडून हैदराबादचा सात धावांनी पराभव


आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत नऊ गडी गमावून 144 धावा केल्या. मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी 34-34 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावाच करू शकला. मयंक अग्रवालने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याचवेळी हेनरिक क्लासेनने 19 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


DC vs SRH : दिल्लीचा 'कर्दनकाळ' ठरला वॉशिंग्टन सुंदर, एका षटकात 3 गडी बाद; पाहा Video