MI vs SRH Live Updates: हैदराबादचा मुंबईवर तीन धावांनी विजय

MI vs SRH Live Updates: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) एकमेकांच्या समोर येणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 May 2022 11:32 PM
MI vs SRH Live Updates: हैदराबादचा मुंबईवर तीन धावांनी विजय

MI vs SRH, IPL 2022: मुंबईविरुद्ध (Mumbai Indians) सामन्यातही सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) उमरान मलिकनं (Umran Malik) चमकदार कामगिरी करून दाखवली. या सामन्यात त्यानं मुंबईच्या तीन महत्वाच्या फलंदाजानं आपल्या जाळ्यात अकडलं. ज्यामुळं हैदराबादच्या संघानं सामन्यावर मजूबत पकड मिळवली. हैदराबादनं दिलेल्या 194 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची दमछाक झाली. मुंबईनं 20 षटकात सात विकेट्स गमावून 190 धावा केल्या.हा सामना हैदराबादच्या संघानं तीन धावांनी जिंकला आहे. 

MI vs SRH Live Updates: मुंबईच्या संघाला दुसरा धक्का, ईशान किशन आऊट

सनरायजर्स हैदराबादच्या संघानं दिलेल्या 194 लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांच्या पहिल्या विकेटससाठी 95 धावांची भागेदारी झाली. परंतु, अकराव्या षटकात रोहित शर्मा तर, बाराव्या षटकात ईशान किशनला बाद करून हैदराबादच्या संघानं जोरदार कमबॅक केलं आहे. 

MI vs SRH Live Updates: हैदराबादचं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य

MI vs SRH, IPL 2022: मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून राहुल त्रिपाठीनं आक्रमक फलंदाजी केली. हैदराबादच्या संघाला गरज असताना त्यानं 44 चेंडूत 76 धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीच्या झुंजार अर्धशतकाचा जोरावर हैदराबादच्या संघानं मुंबईसमोर 20 षटकात 5 विकेट गमावून 194 धावांचं लक्ष्य ठेवलं. 

MI vs SRH Live Updates: हैदराबादचा अर्धा संघ 176 धावांवर माघारी परतला

मुंबईविरुद्ध वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात पलटणच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलंय. दरम्यान, 176 धावांवर अर्धा संघ माघारी परतला आहे. 

MI vs SRH: हैदराबादला तिसरा धक्का, निकोलस पूरन बाद

मुंबईविरुद्ध सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या संघाला तिसऱ्या धक्का बसला आहे. निकोलस पूरनच्या रुपात हैदराबादनं तिसरी विकेट गमावली.

MI vs SRH: मुंबईविरुद्ध राहुल त्रिपाठीचं अर्धशतक 

मुंबई विरुद्ध सामन्यात राहुल त्रिपाठीनं अर्धशतक ठोकलं आहे. त्यानं 32 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 

MI vs SRH, IPL 2022: मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), डॅनियल सॅम्स, तिळक वर्मा, रमणदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे. 

MI vs SRH, IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, एफ. फारुकी, उमरान मलिक, टी नटराजन. 

MI vs SRH, IPL 2022: मुंबईनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार

MI vs SRH, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने- सामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  यंदाचा हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. मुंबईनं 12 पैकी नऊ सामने गमावले आहेत. तर, त्यांना फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. दुसरीकडं हैदराबादच्या संघानं 12 पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, सात सामने गमावले आहेत. अजूनही हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत आहे.

मुंबई- हैदराबाद यांच्यातील सामना कधी, कुठे पाहणार?

मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज (16 मे) आयपीएल 2022 मधील 65 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमने- सामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबई- हैदराबाद यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच सात वाजता नाणेफेक होईल. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 

MI vs SRH Live Updates: मुंबई- हैदराबाद हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघात अतिशय अटीतटीची लढत  पाहायला मिळाली आहे. दरम्यान, मुंबईच्या संघानं नऊ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, हैदराबादच्या संघाला आठ वेळा मुंबईच्या संघाला पराभूत करता आलं आहे. यंदाचा हंगाम मुंबईच्या संघासाठी खराब ठरला आहे. ज्यामुळं मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडं प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी हैदराबादचा संघ मुंबईविरुद्ध आजचा सामना खेळणार आहे. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

पार्श्वभूमी

MI vs SRH Live Updates: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) एकमेकांच्या समोर येणार आहेत. यंदाचा हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. मुंबईनं 12 पैकी नऊ सामने गमावले आहेत. तर, त्यांना फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. दुसरीकडं हैदराबादच्या संघानं 12 पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, सात सामने गमावले आहेत. अजूनही हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत आहे. त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यात चांगल्या रनरेटनं विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्यानंतरही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहवं लागणार आहे. 

मुंबई- हैदराबाद हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघात अतिशय अटीतटीची लढत  पाहायला मिळाली आहे. दरम्यान, मुंबईच्या संघानं नऊ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, हैदराबादच्या संघाला आठ वेळा मुंबईच्या संघाला पराभूत करता आलं आहे. यंदाचा हंगाम मुंबईच्या संघासाठी खराब ठरला आहे. ज्यामुळं मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडं प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी हैदराबादचा संघ मुंबईविरुद्ध आजचा सामना खेळणार आहे. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

कधी, कुठे पाहता येणार सामना?
मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज (16 मे) आयपीएल 2022 मधील 65 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमने- सामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबई- हैदराबाद यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच सात वाजता नाणेफेक होईल. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.