MI Vs PBKS LIVE Score Updates, IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज भिडणार, विजयाच्या ट्रॅकवर कोण परतणार?

Mumbai Indians Vs Punjab Kings LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमधील 33 वी मॅच पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.

युवराज जाधव Last Updated: 18 Apr 2024 11:38 PM
मुंबईचा 9 धावांनी विजय

मुंबईचा पंजाबवर 9 धावांनी विजय

पंजाबला नववा धक्का

हरप्रीत ब्रारच्या रुपाने पंजाबला नववा धक्का बसलाय.

पंजाबला मोठा धक्का

आशुतोष शर्मा बाद झाला. पंजाबला मोठा धक्का बसला. सामना रोमांचक स्थितीमध्ये

सामना रोमांचक स्थितीत, आशुतोष शर्माचं अर्धशतक

मुंबईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबनं जोरदार लढत दिली. पंजाबकडून आशुतोष शर्मानं शानदार अर्धशतक ठोकलं. 

शशांकनं दिला लढा

आघाडीचे फलंदाज लवकर तंबूत परतल्यानंतर शशांक सिंह यांनी लढादिला. शशांक सिंह यानं 25 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी केली.

पंजाबचे आघाडीचे फलंदाज फ्लॉप गेले

 


193 धावांचा पाठलाग करताना पंजाबची अवस्था अतिशय कठीण झाली. पंजाबकडून आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. सॅम करन, प्रभसिमरन, रायली रुसो, लियाम लिव्हिंगस्टोन यांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. 

पंजाबची स्थिती कठीण

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची स्थिती बिकट झाली आहे. पंजाबची मदार पुन्हा एकदा आशुतोष याच्यावर आहे. पंजाब सात बाद 127 धावा

सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान

 


PBKS vs MI  IPL 2024 :  सूर्यकुमार यादवच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईनं निर्धारित 20 षटकांमध्ये सात विकेटच्या मोबदल्यात 192 धावांपर्यंत मजल मारली. 

मुंबईला सहावा धक्का

मुंबईला सहावा धक्का.. शेफर्ड स्वस्तात बाद

टीम डेविड बाद

टीम डेविड बाद.. मुंबईला पाचवा धक्का

हार्दिक पांड्या स्वस्तात बाद

 


हार्दिक पांड्याला फक्त 10 धावा करता आल्या. सहा चेंडूमध्ये एका षटकराच्या मदतीने त्यानं 10 धावा केल्या.

मुंबईला तिसरा धक्का

सूर्यकुमारच्या रुपाने मुंबईला तिसरा धक्का बसला आहे. 

मुंबईला दुसरा धक्का

 


रोहित शर्माच्या रुपाने मुंबईला दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा 25 चंडूत 36 धावा काढून बाद झाला. मुंबई 2 बाद 99 धावा.

रोहित सूर्याची जोडी जमली

ईशान किशन लवकर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवनं रोहितसोबत मुंबईच्या डावाला आकार दिला. सूर्यकुमार यादवने 34 चेंडूमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केले. मुंभई 10 षटकानंतर एक बाद 87 धावा

मुंबईची शानदार सुरुवात

ईशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मानं मुंबईचा डाव सावरला आहे. 6 षटकानंतर एक बाद 54 धावा

मुंबईच्या ताफ्यात कोण ?

रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेविड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, गेराल्ड कोएत्ज़ी, जसप्रीत बुमराह

पंजाबच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण :

राइली रूसो, प्रभसिमरन सिंह, सॅम करन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंह, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा

पंजाबनं नाणेफेक जिंकली

मुंबईची प्रथम फलंदाजी

MI vs PBKS : मुंबई इंडियन्स अन् पंजाब किंग्ज कोण कुणाला वरचढ?

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आतापर्यंत 31 वेळा आमने सामने आले आहेत. त्यात 16 मॅच मुंबईनं तर 15 मॅच पंजाबनं जिंकल्या आहेत. 

शिखर धवन मुंबई विरुद्ध खेळण्याची शक्यता कमी

शिखर धवन मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. 

पंजाब किंग्जचा देखील चारवेळा पराभव

पंजाब किंग्जचा देखील यंदाच्या आयपीएलमध्ये चार वेळा पराभव झाला आहे. 

मुंबई इंडियन्सचे चार पराभव

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयीपएलमध्ये चार वेळा पराभव झालेला आहे. 

शिखर धवन आज देखील खेळण्याची शक्यता कमी

पंजाब किंग्जचा कॅप्टन शिखर धवन जखमी असल्यानं तो मुंबई विरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. 

आयपीएलमध्ये आज मुंबई आणि पंजाब आमने सामने येणार

आयपीएलमध्ये आज मुंबई आणि पंजाब आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांना प्ले ऑफमधील आशा कायम ठेवण्यासाठी विजयाची गरज आहे.

पार्श्वभूमी

MI Vs PBKS LIVE Score Updates, IPL 2024 :आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलमधील 33 वी मॅच होत आहे. मुंबई आणि पंजाबच्या संघानं सहा पैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे. गुणतालिकेत दोन्ही संघांचे गुण सारखेच असून नेट रनरेटच्या मुद्यावर पंजाब किंग्ज वरच्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 वी मॅच खेळणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स कमबॅक करतं का ते पाहावं लागेल. तर, शिखर धवनच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्जचा देखील विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.