MI vs GT, IPL 2023 Qualifier 2 Live: गुजरात-मुंबईमध्ये काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकावर

आयपीएल 2023 मधील दुसरा क्वालिफायर (IPL Qualifier 2) सामना आज पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या संघात रंगणार आहे. 

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 26 May 2023 11:57 PM
गुजरातचा फायनलमध्ये प्रवेश

गुजरातचा फायनलमध्ये प्रवेश

मुंबईला नववा धक्का

मुंबईला नववा धक्का... चावला बाद

मुंबईला आठवा धक्का

मुंबईला आठवा धक्का बसलाय.. ख्रिस जॉर्डन दोन धावांवर बाद

विष्णू विनोद बाद

विष्णू विनोद बाद.....  मुंबईला सहावा धक्का

मुंबईचा अर्धा संघ तंबूत

मुंबईचा अर्धा संघ तंबूत... 61 धावांवर सूर्यकुमार यादव बाद

सूर्याचे अर्धशतक

षटकार लगावत सूर्याने झळकावले अर्धशतक

शमीची खराब फिल्डिंग

शमीची खराब फिल्डिंग..... विष्णू विनोदचा सोडला झेल

कॅमरुन ग्रीन बाद

कॅमरुन ग्रीन 30 धावांवर बाद

मुंबईला तिसरा धक्का

मुंबईला तिसरा धक्का... तिलक वर्मा 43 धावांवर बाद झालाय..  तिलक वर्माने 14 चेंडूत 43 धावांची खेळी केली.

मुंबईला मोठा धक्का

मुंबईला मोठा धक्का बसलाय... रोहित शर्मा बाद झालाय

मुंबईच्या अडचणीत वाढ

तुफान फॉर्मात असलेला कॅमरुन ग्रीन दुखापतग्रस्त झालाय...  ग्रीनला मैदान सोडावे लागलेय... 

मुंबईला पहिला धक्का

मुंबईला पहिला धक्का... नेहल वढेरा बाद

गुजरातची 233 धावांपर्यंत मजल

गुजरातची 233 धावांपर्यंत मजल

साई सुदर्शन रिटायर्ट हर्ट

साई सुदर्शन रिटायर्ट हर्ट... 43 धावा काढून परतला माघारी

गुजरातला दुसरा धक्का

गुजरातला दुसरा धक्का बसलाय. शतकवीर शुभमन गिल बाद... 

मुंबईला धक्का

विकेटकिपर आणि सलामी फलंदाज इशान किशन याला फिल्डिंग करताना दुखापत झाली आहे.... त्याच्याजागी विष्णू विनोद विकेटकिपिंगला आलाय.

यंदाच्या हंगामात गिल याचे तिसरे शतक

Shubman Gill Century : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शुभमन गिलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडतोय. मुंबईविरोधात क्वालिफायर दोन सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली आहे. यंदाच्या हंगामात गिल याचे तिसरे शतक आहे. मोक्याच्या सामन्यात गिल याने शतकाला गवसणी घातली आहे. 49 चेंडूत शुभमन गिल याने शतक झळकावले.  8 षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने गिलने शतक झळकावले. 

शुभमन गिलची विस्फोटक फलंदाजी

शुभमन गिलची विस्फोटक फलंदाजी

गुजरातला पहिला धक्का

गुजरातला पहिला धक्का.. वृद्धीमान साहा बाद

शुभमन गिल-साहाची दमदार सुरुवात

शुभमन गिल-साहाची दमदार सुरुवात

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11

 -  इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल

गुजरात टायटन्स प्लेईंग 11

वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

मुंबईच्या संघात एक बदल

मुंबईच्या संघात एक बदल... कुमार कार्तिकेयला संधी

गुजरात प्रथम फलंदाजी करणार

गुजरात प्रथम फलंदाजी करणार

मुंबईची प्रथम गोलंदाजी

मुंबईची प्रथम गोलंदाजी

मुंबईने नाणेफेक जिंकली

मुंबईने नाणेफेक जिंकली

गुजरातच्या संघात शिवम मावीला संधी

गुजरातच्या संघात शिवम मावीला संधी

पाऊस थांबला.. थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात सामना सुरु होणार

थोड्याच वेळात सामना सुरु होणार... पावसामुळे नाणेफेकीला उशीर

गुजरात-मुंबई सामन्यात पावसाचा व्यत्यय

पावसाचा व्यत्यय 

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना

पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सातव्या अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज, 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

GT vs MI Head to Head : मुंबई विरुद्ध गुजरात हेड-टू-हेड

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ तीन वेळा आमने-सामने आले आहे. या आकडेवारीनुसार, मुंबई इंडियन्सचं पारड जड आहे. तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्याने अहमदाबादमध्ये या हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी आयपीएल विजेत्या मुंबईचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएल 2022 (IPL 2022) आणि आणि आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये प्रत्येकी एका लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला.

कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?

चेन्नई सुपर किंग्स संघाने (CSK) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये (IPL 2023 Qualifier 1) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करून थेट अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या मोसमात याआधी मुंबई आणि गुजरात हे दोन संघ आमने-सामने आले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. या मोसमाच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सने (GT) मुंबई इंडियन्सला (MI) घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर पुढील सामन्यात मुंबई इंडियन्सनं पराभवाचा वचपा काढत विजय मिळवला. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील मुंबई इंडियन्सचा दमदार विक्रम पाहता आकडेवारीनुसार, मुंबईचं पारड जड आहे. 

पार्श्वभूमी

आयपीएल 2023 (Indian Premier League) मधील दुसरा क्वालिफायर (IPL Qualifier 2) सामना आज पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या संघात रंगणार आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पार पडणार आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यातील विजयी संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. या सामन्यातील विजेता संघाचा सामना रविवारी अंतिम फेरीत चार वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाशी होईल. आयपीएल 2023 चा बहुप्रतिक्षित अंतिम सामना 28 मे रोजी पार पडणार आहे.

कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?

चेन्नई सुपर किंग्स संघाने (CSK) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये (IPL 2023 Qualifier 1) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करून थेट अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या मोसमात याआधी मुंबई आणि गुजरात हे दोन संघ आमने-सामने आले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. या मोसमाच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सने (GT) मुंबई इंडियन्सला (MI) घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर पुढील सामन्यात मुंबई इंडियन्सनं पराभवाचा वचपा काढत विजय मिळवला. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील मुंबई इंडियन्सचा दमदार विक्रम पाहता आकडेवारीनुसार, मुंबईचं पारड जड आहे. 

GT vs MI Head to Head : मुंबई विरुद्ध गुजरात हेड-टू-हेड

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ तीन वेळा आमने-सामने आले आहे. या आकडेवारीनुसार, मुंबई इंडियन्सचं पारड जड आहे. तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्याने अहमदाबादमध्ये या हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी आयपीएल विजेत्या मुंबईचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएल 2022 (IPL 2022) आणि आणि आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये प्रत्येकी एका लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना

पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सातव्या अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज, 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.