MI vs GT, IPL 2023 Live: मुंबई आणि हार्दिक यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
MI vs GT Live Score: वानखेडे मैदानावर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या आमने सामने असतील.. कोण बाजी मारणार... याकडे चाहत्यांचे लक्ष
नामदेव कुंभार Last Updated: 12 May 2023 11:28 PM
पार्श्वभूमी
IPL 2023, Match 53, MI vs GT:भन्नाट फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्ससमोर पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान असेल. वानखेडे मैदानावर दोन्ही संघामध्ये रंगतदार सामना होईल. हार्दिक पांड्या वानखेडेच्या मैदानावर...More
IPL 2023, Match 53, MI vs GT:भन्नाट फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्ससमोर पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान असेल. वानखेडे मैदानावर दोन्ही संघामध्ये रंगतदार सामना होईल. हार्दिक पांड्या वानखेडेच्या मैदानावर अनेक वर्ष खेळलेला आहे, याचा फायदा गुजरातला होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईने मागील सामन्यात 200 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय.. त्यातच मुंबई घरच्या मैदानावर खेळत आहे... प्रेक्षकांचा सपोर्टही मुंबईला असेल.. त्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील मैत्री जगजाहिर आहे.. आता आयपीएलच्या मैदानावर हे दोन्ही मित्र आमनेसामने आलेत.गुजरातचा संघ संतुलीत -गतविजेता गुजरात यंदा दमदार फॉर्मात आहे. गुजरातचा संघ प्रत्येक स्थरावर सरस असल्याचे दिसतेय. गुजरातच्या संघाची कमकुवत बाजू दिसून येत नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीत गुजरातचा संघ समतोल दिसतेय. गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी भेदक मारा केलाय. त्यांच्या जोडीला मोहित शर्मासह इतर गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. फलंदाजीत वृद्धीमान साहा, शुभमन गिल, डेविड मिलर, राहुल तेवातिया यांच्यासह इतर फलंदाज आपली कामगिरी चोख बजवात आहे. हार्दिक पांड्या याचे फलंदाजीत सातत्य दिसत नाही... हाच काय तो गुजरात संघासमोरील मोठा प्रश्न आहे. मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 19 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजीत हे आघाडीवर आहेत. फलंदाजीत शुभमन गिल याने 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मुंबईची ताकद काय.. कमकुवत बाजू कोणती ? रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात आरसीबीचा पराभव केला होता. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत आघाडीच्या चार संघांमध्ये स्थान पटकावले. रोहित शर्माची निराशाजनक कामगिरी मुंबईसाठी डोकेदुखी ठरतेय. त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याशिवाय गोलंदाजी ही मुंबईसाठी सर्वात कमकुवत बाजू ठरते. पीयूष चावलाचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखता आलेल्या नाहीत. चावला मुंबई कडून सर्वाधिक क्रिकेट घेणारा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. पण आर्चरही दुखापतग्रस्त झाला. ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरनड्रॉफ, कॅमरुन ग्रीन यांच्यासह इतर गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश येतेय. गोलंदाजी मुंबईसाठी डोकेदुखी ठरत आहे. ईशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा यांनी मुंबईसाठी धावांचा पाऊस पाडलाय. त्याशइवाय कॅमरुन ग्रीन, टिम डेविड आपली कामगिरी चोख बजावत आहेत. रोहितच्या खराब फॉर्मनंतरही मुंबईने 200 धावा यशस्वी चेस केल्या होत्या. तिलक वर्मा दुखापतीमुळे मागील सामन्यात नव्हता.. आज तो खळण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती काय?हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने 11 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 16 गुणांसह प्लोऑफच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईते 11 सामन्यात 12 गुण आहेत. पाच वेळच्या विजेत्या मुंबईला पाच सामन्यात पराभव ाचा सामना करावा लागलाय. मुंबई गुणतालिकेत आघाडीच्या चार संघामध्ये आहे.मागील पाच सामन्यात काय झाले ?मागील पाच सामन्यात गुजरातने चार विजय मिळवले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने मागील दोन्ही सामन्यात विजय मिळवलााय. मुंबईचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रीककरण्याचा इरादा गुजरातचा असेल. दुसरकडे मुंबईला मागील पाच सामन्यात तीन विजय मिळाले आहेत. नऊ मे रोजी मुंबईने वानखेडेवर आरसीबीचा पराभव केला होता. घरच्या मैदानावर सामना असल्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.मुंबई इंडियन्स टीम -रोहित शर्मा (कर्णधार) कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.गुजरात टायटन्स टीम -हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईचा गुजरातवर २७ धावांनी विजय
मुंबईचा गुजरातवर २७ धावांनी विजय