अहमदाबाद :मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे मॅच होणार आहे. या मॅचसाठी दोन्ही संघांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल स्पर्ध्ते सहावं विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्सनं यापूर्वी पाचवेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबईनं यावेळी नेतृत्त्वाची जबाबदारी हार्दिक पांड्या याच्यावर दिली आहे. मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर देखील सक्रीय असते. मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा आणि इशान किशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.


मुंबईनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय?


मुंबई इंडियन्सनं शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्मा आणि इसान किशन नेट प्रॅक्टीस करताना दिसत आहेत. या व्हिडीओत नेट प्रॅक्टीसवेळी रोहित शर्मा आणि इशान किशन मोठमोठे फटके मारताना दिसत आहेत. रोहित शर्मा आणि इसान किशनच्या या व्हिडिओला मुंबई इंडियन्सनं मग होऊ द्या राडा असं कॅप्शन दिलं आहे. 


मुंबई इंडियन्स पूर्ण तयारीसह मैदानात उतरणार


आयपीएलमधील आपल्या पहिल्या लढतीसाठी मुंबई इंडियन्सची टीम सज्ज झाली आहे. मुंबई इंडियन्सचा यावेळी विजेतेपदाचा  दुष्काळ संपवण्याचा निर्धार असेल. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. मुंबईनं 2020 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर गेल्या तीन आयपीएल स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी समाधानकारक झालेली नव्हती. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं यावेळी नेतृत्त्व बदल करण्याचा निर्णय घेत हार्दिक पांड्याला गुजरा टायटन्समधून परत आपल्या संघात घेतलं आहे. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स आता आयपीएलमध्ये खेळणार आहे. 






रोहित शर्मा  आणि हार्दिक पांड्यावर भिस्त 


मुंबई इंडियन्सची धुरा प्रामुख्यानं रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यावर असेल. हार्दिक पांड्याचं संघात कमबॅक झालं असून आता तो नेमक्या कोणत्या स्थानावर मैदानात उतरणार याकडे लक्ष लागलं आहे. सूर्यकुमार यादव अनफिट असल्यानं  हार्दिक पांड्याला त्याच्या जागी चौथ्या स्थानी बॅटिंग करण्याची संधी आहे. 


सहावं विजेतेपद मिळवण्याचं आव्हान


मुंबई इंडियन्सच्या संघानं आतापर्यंत पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मुंबईनं यापूर्वी 2013, 2015, 2017 आणि 2019, 2020 या वर्षातील आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. मुंबईला  2020 नंतरच्या तीन स्पर्धांमध्ये विजय मिळवता आला नव्हता.  यामुळं यंदाच्या 17 व्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानं मुंबई इंडियन्सची टीम मैदानावर उतरेल. आजच्या गुजरात विरुद्धच्या लढतीकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या : 


IPL 2024 : चेन्नई नव्हे तर हा संघ चषक उंचवणार, गावसकरांनी केली सर्वात मोठी भविष्यवाणी


GT vs MI : मुंबईचा पहिला सामना गुजरातशी, मोहम्मद शमीला पर्याय शोधला, मराठमोळ्या बॉलरवर टायटन्सची धुरा