MI vs DC IPL 2022 LIVE Update : दिल्लीचा मुंबईवर थरारक विजय, अक्षर पटेलची वादळी खेळी

MI vs DC IPL 2022 LIVE Update : ऋषभ पंत आणि रोहित शर्मा आमनेसामने आहेत. वानखेडे मैदानावर मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना रंगणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Mar 2022 07:18 PM
दिल्लीचा मुंबईवर थरारक विजय, अक्षर पटेलची वादळी खेळी

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 विकेट्सनं पराभूत केलंय. मुंबईच्या संघानं दिलेल्या 178 धावांचं लक्ष्य दिल्लीनं 10 चेंडू राखून विजय मिळवला आहे. दिल्लीच्या विजयात अष्टपैलू अक्षर पटेलनं मोलाचा वाटा आहे. त्यानं 17 चेंडूत 38 धावा केल्या.

IPL 2022: शार्दूल ठाकूर बाद, दिल्लीला सहावा झटका

मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीच्या संघाच्या विजयाच्या आशा धुसूर होताना दिसत आहे. मुंबईनं दिलेल्या 178 लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीनं शार्दूल ठाकूरच्या रुपात आपला सहावा विकेट्स गमावला आहे.

IPL 2022: 94 धावांवर दिल्लीचा अर्धा संघ माघारी

मुंबईच्या संघानं दिलेल्या 178 लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ डगमगताना दिसत आहे. दिल्लीनं 94 धावांवर त्यांचे पाच विकेट्स गमावल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी आता 48 चेंडूत 84 धावांची गरज आहे.

मुंबईच्या गोलंदाजांचं जोरदार कमबॅक, दिल्लीच्या तीन फलंदाजांना धाडलं माघारी

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई आणि दिल्ली यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं दिल्लीसमोर 178 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघ डममगताना दिसत आहे. दिल्लीनं आतापर्यंत 40 धावांच्या आत तीन विकेट्स गमावले आहेत.

दिल्लीच्या संघाला पहिला झटका

मुंबईच्या संघानं दिलेल्या 178 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीच्या संघाला पहिला झटका लागलाय. सलामीवीर टीम सेफर्टनं त्याची विकेट्स गमावलीय. दिल्लीला जिंकण्यासाठी आणखी 148 धावांची आवश्यकता आहे. 


 

TATA IPL 2022: ईशान किशनचं अर्धशतक

दिल्लीविरुद्ध पहिल्या सामन्यात मुंबईचा सलामीवीर ईशान किशनं अर्धशतक ठोकलं आहे. त्यानं अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलंय. 

IPL 2022: मुंबईचे चार खेळाडू माघारी, दिल्लीचं जोरदार कमबॅक

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात आक्रमक सुरुवात करणाऱ्या मुंबईच्या संघाला दिल्लीच्या संघानं चौथा झटका देत सामन्यात जोरदार कमबॅक केलंय. 

मुंबईला दुसरा झटका, रोहित शर्मानंतर अनमोलप्रीत सिंहनं गमावली विकेट्स

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं दुसरा विकेट्स गमावला आहे. दरम्यान, कुलदीप यादवनं रोहित शर्मापाठोपाठ अनमोलप्रीत सिंहला माघारी धाडलं आहे. 

MI vs DC: मुंबईला मोठा धक्का, कुलदीप यादवने रोहित शर्माला केले बाद

MI Vs DC: दिल्लीविरुद्ध सामन्यात मुंबईच्या चांगली सुरुवात करून देणारा कर्णधार रोहित शर्मा आऊट झालाय. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. त्यानं 32 चेंडूत 41 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा- ईशान किशनची आक्रमक खेळी, पहिल्या पाच षटकात मुंबईचा स्कोर 48 वर

मुंबई- दिल्ली यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियम यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशननं संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. 


 

मुंबई विरुद्ध दिल्लीच्या सामन्याला सुरुवात

मुंबई विरुद्ध दिल्लीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. 

MI vs DC IPL 2022 LIVE Update : दिल्लीचा संघ

MI vs DC IPL 2022 LIVE Update :  पृथ्वी शॉ, टीम सायफंट, मनदीप सिंह, ऋषभ पंत, रॉमवेन पॉवेल, ललीत यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, खलील अहमद





MI vs DC IPL 2022 LIVE Update : मुंबईचा संघ 

MI vs DC IPL 2022 LIVE Update : इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टीम डेविड, डॅनिअल सॅम्स, मुर्गन अश्विन, टायले मिल्स, जसप्रीत बुमराह, बसील थम्पी 





MI vs DC IPL 2022 LIVE Update : दिल्लीने नाणेफेक जिंकली

 MI vs DC IPL 2022 LIVE Update :  दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पार्श्वभूमी

MI vs DC IPL 2022 LIVE Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 15 व्या हंगमातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज चाहत्यांना क्रिकेटचा चांगलाचं थरार अनुभवायला मिळणार आहे.  मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये सामना रंघणार आहे.  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित शर्मा बरोबरचं इशान किशन आणि किरॉन पोलार्ड यांच्यासारखे तगडे खेळाडू देखी मुंबईकडे आहेत. त्यांच्या कामगिरीवर देखील सर्वाचं लक्ष असणार आहे. तर दिल्लीचा संघ देखील तगडा मानला जातोय. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ आज मैदानात उतरणार आहे. त्याच्या कामगिरीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.


दिल्ली संघाकडून टीम सेफर्ट आणि पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करु शकतात. कारण ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर अद्याप संघाशी जोडलेला नाही. दिल्लीच्या कामगिरीची चावी मात्र कर्णधार पंतच्या हातात असणार आहे. त्याला आघाडीतून नेतृत्व करावे लागेल. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज रोव्हमन पॉवेल, फॉर्मात असलेला सरफराज खान आणि अंडर 19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुल यांच्याकडून मधल्या फळीत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल फिनिशरची भूमिका बजावतील. गोलंदाज कुलदीप यादव अक्षरसोबत फिरकीची धुरा सांभाळू शकतो. वेगवान आक्रमणाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा अॅनरिक नॉर्टजे करेल, त्याला मुस्तफिझूर रहमानची साथ असेल. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग हा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीलाही आजमावू शकतात, त्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीने गेल्या वेळी दोन्ही सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळं संघ यावेळीही त्याच मनोधैर्याने जाणार आहे.


मुंबई इंडियन्स संपूर्ण संघ - 
रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), फॅबियन अॅलन (75 लाख), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख), रमनदीप सिंह (20 लाख), राहुल बुद्धी (20 लाख), ऋतिक शौकीन (20 लाख), आर्यन ज्युयल (20 लाख), अनोलप्रीत सिंह (20 लाख). 


दिल्ली कॅपिटल्सचा संघ - 
फलंदाज - पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मनदीप सिंह, यश धुल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, अश्विन हॅब्बार


गोलंदाज - चेतन साकरिया, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दूल ठाकुर


अष्टपैलू - अक्षर यादव, ललित यादव, रिपल पटेल, विक्की ओत्सवाल, मिचेल मार्श


विकेटकीपर- ऋषभ पंत (कर्णधार), केएस भरत, टिम सिफर्ट


फिरकीपटू - कुलदीप यादव, प्रवीण दुबे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.