= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईचा शेवट गोड, अखेरच्या सामन्यात दिल्लीला हरवले अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करत शेवट गोड केला आहे. रोमांचक सामन्यात मुंबईने दिल्लीचा पाच गड्यांनी पराभव केलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईचा अर्धा संघ तंबूत, तिलक वर्मा बाद मोक्याच्या क्षणी तिलक वर्मा २१ धावांवर बाद झालाय.. मुंबईला पाचवा धक्का बसला.... मुंबईला विजयासाठी सात चेंडूत पाच धावांची गरज
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईला चौथा धक्का, टीम डेविड बाद शार्दुल ठाकूरने टीम डेविडला ३४ धावांवर बाद करत मुंबईला चौथा धक्का दिलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
टीम डेविडने सामना फिरवला मुंबईच्या टीम डेविडने षटकारांचा पाऊस पाडत सामना मुंबईच्या बाजूने झुकवला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईला तिसरा धक्का, डेवॉल्ड ब्रेविस बाद ईशान किशननंतर डेवॉल्ड ब्रेविसही बाद.. शार्दुल ठाकूरने ब्रेविसला 37 धावांवर बाद झालाय. मुंबई तीन बाद ८५ धावा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कुलदीपचा मुंबईला धक्का, ईशान किशन बाद कुलदीप यादवने ईशान किशनला बाद करत मुंबईला धक्का दिला..ईशान किशन ४८ धावांवर बाद...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रोहित पुन्हा फ्लॉप, दोन धावा काढून बाद मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा स्वस्तात बाद झाला...दहापेक्षा जास्त चेंडू खेळून फक्त दोन धावा काढून रोहित बाद झालायय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: दिल्लीचं मुंबईसमोर 160 धावांचं आव्हान मुंबईचा स्टार फलंदाज जसप्रीत बुमराहनं दिल्लीविरुद्ध चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यात त्यानं दिल्लीच्या तीन महत्वाच्या फलंदाजा आपल्या जाळ्यात अडकवून माघारी धाडलं. जसप्रीत बुमराहसह डेनियल सॅम्स, मयांक अग्रवाल आणि रमनदीप सिंहनंही चांगली गोंलदाजी केली. ज्यामुळं दिल्लीच्या संघाला 20 षटकात सात विकेट्स गमावून 159 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 43 धावा केल्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: मुंबईची भेदक गोलंदाजी, दिल्लीचा अर्धा संघ माघारी मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. दिल्लीचा अर्धा संघ 125 धावांवर माघारी परतला आहे. दिल्लीनं 16 षटकात 125 धावा करून पाच विकेट्स गमावले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: दिल्लीची खराब सुरुवात, सर्फराज खानही आऊट, मुंबईला चौथ यश MI vs DC Live Updates: मुंबईविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुढघे टेकल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीनं दहा षटकाच्या आत त्यांचे चार विकेट्स गमावले असून त्यांना 60 धावांचा टप्पाही गाठला नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: दिल्लीनं तिसरी विकेट गमावली, पृथ्वी शॉ स्वस्तात माघारी परतला MI vs DC Live Updates: आजच्या सामन्यात दिल्लीच्या संघात पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला आहे. त्यानं 23 चेंडूत 24 धावा केल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: मिचेल मार्शच्या रुपात दिल्लीला दुसरा धक्का मिचेल मार्शच्या रुपात दिल्लीच्या संघाला दुसरा धक्का बसला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मिचेश मार्श खाते न उघडतात पव्हेलियनमध्ये पोहचला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: डेव्हिड वार्नर आऊट, दिल्लीला पहिला झटका मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीची खराब सुरुवात झाली आहे. या सामन्यात डेव्हिड वार्नरच्या रुपात दिल्लीच्या संघाला पहिला धक्का लागला आहे. डेव्हिड वार्नर पाच धावा करून माघारी परतला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: मुंबई- दिल्ली सामन्याला सुरुवात, पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वार्नर फलंदाजीसाठी मैदानात मुंबई आणि दिल्ली यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएल 2022 चा 68 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वार्नर फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), डेवाल्ड ब्रेविस, तिळक वर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंह, डॅनियल सॅम्स, हृतिक शॉकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), सरफराज खान, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: मुंबईनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात येणाऱ्या आयपीएल 2022 च्या 68 व्या सामन्यात मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. आजचा सामना दिल्लीच्या संघासाठी महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात मुंबईला पराभूत करण्यासाठी आणि प्लेऑफचं तिकिट निश्चित करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या संघासाठी आजचा सामना औपचारिक असला तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: मुंबई- दिल्ली यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आतापर्यंत एकूण 31 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी दिल्लीनं 15 तर, मुंबईनं 16 सामने जिंकले आहेत. भारतात दोन्ही संघ 23 वेळा एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत. त्यापैकी दिल्लीनं 11 तर, मुंबईनं 12 जिंकले आहेत. यूएईमध्ये दिल्ली आणि मुंबई यांच्यात 8 सामने खेळले गेले. ज्यात दोन्ही संघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. मुंबईविरुद्ध दिल्लीची सरासरी धावसंख्या 146 आहे. तर, दिल्लीविरुद्ध मुंबईची सरासरी धावसंख्या 162 इतकी आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतनं मुंबईविरुद्ध सर्वाधिक 333 धावा केल्या आहेत. तर, मुंबईकडून रोहित शर्मानं दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 910 धावा केल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MI vs DC Live Updates: मुंबई- दिल्ली यांच्यातील सामना कधी, कुठे पाहणार? मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2020 मधील 69 वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आज (21 मे) संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर इतर अनेक भारतीय भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकू शकता. यावेळी तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि गुजराती या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवर सामन्यातील सर्व अपडेट्स पाहू शकता.