MI vs CSK LIVE Score: एल क्लासिको, मुंबई-चेन्नई आमनेसामने, कोण मारणार बाजी? संक्षिप्त आढावा

IPL 2024, MI vs CSK LIVE Score: चेन्नई आणि मुंबईसाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा असेल.

नामदेव कुंभार Last Updated: 14 Apr 2024 11:23 PM
मुंबईचा पराभव

चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. रोहित शर्माची शतकी खेळी अपयशी

रोहित शर्माचं शानदार शतक

रोहित शर्मानं 61 चेंडूमध्ये शानदार शतक ठोकलं. आयपीएलमधील हे दुसरं शतक होय

सामना चेन्नईच्या बाजूने

मुंबईला अखेरच्या षटकात 6 चेंडूमध्ये 34 धावांची गरज

मुंबईला मोठा धक्का

पथिरानानं मुंबईला दिला मोठा धक्का दिला. रोमिरिओ शेफर्डला त्रिफाळाचीत करत मुंभईला दिला मोठा धक्का

टीम डेविड बाद

टीम डेविडच्या रुपाने मुंबईला पाचवा धक्का.... सामना रोमांचक स्थितीत

मुंबईला आणखी एक धक्का

हार्दिक पांड्याच्या रुपाने मुंबईला आणखी एक धक्का.. पांड्या स्वस्तात तंबूत परतला आहे.

मुंबईला चौथा धक्का

पथिरानानं मुंबईला दिला चौथा धक्का... तिलक वर्माला 31 धावांवर पाठवलं तंबूत.. सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचला आहे.  रोहित शर्माची दुसऱ्या बाजूने एकाकी लढत सुरु

रोहित शर्माचं शानदार अर्धशतक

207 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं चेन्नईची गोलंदाजी फोडली. रोहित शर्माने 30 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं.

मुंबईला दुसरा धक्का

सूर्यकुमार यादवच्या रुपाने मुंबईला दुसरा धक्का...  सूर्या 0 वर बाद... 

मुंबईला पहिला धक्का

पथिराणानं ईशान किशन याला बाद करत चेन्नईला पहिलं यश मिळवून दिलेय. 

मुंबईची शानदार सुरुवात

रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईसाठी वेगवान सुरुवात केली. दोघांनी पाच षटकात 53 धावांचा पाऊस पाडला. 

चेन्नईची 206 धावांपर्यंत मजल

चेन्नईची 206 धावांपर्यंत मजल

धोनीची फटकेबाजी

हार्दिक पांड्याच्या दोन चेंडूवर धोनीने मारले सलग दोन षटकार.... 

मिचेल बाद

डॅरेल मिचेल यानं 14 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 17 धावांची खेळी केली.


 दुबे आणि मिचेल यांच्यामध्ये 24 चेंडूमध्ये 36 धावांची भागिदारी झाली. 


 

शिवम दुबेचं शानदार अर्धशतक

शिवम दुबेनं मुंबईची गोलंदाजी फोडली. दुबेनं शानदार अर्धशतक ठोकलेय. दुबे 34 चेंडूत 60 धावांवर खेळत आहे.

चेन्नईला तिसरा धक्का

ऋतुराज गायकवाडच्या रुपाने चेन्नईला तिसरा धक्का बसला. ऋतुराज गायकवाड 69 धावा काढून बाद झाला. चेन्नई तीन बाद 150 धावा

चेन्नईची शानदार सुरुवात

ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर चेन्नईने शानदार सुरुवात केली. चेन्नईने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 100 धावांचा पल्ला पार केला आहे.

चेन्नईला पहिला धक्का

अजिंक्य रहाणेच्या रुपाने चेन्नईला पहिला धक्का बसलाय. गेराल्ड कोइत्जेनं रहाणेला पाठवलं तंबूत

चेन्नईची प्लेईंग 11 - 

ऋतुराज गायकवाड, रचिन गायकवाड, डॅरेल मिचेल, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, एमएस धोनी, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान


राखीव खेळाडू - पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 -

  रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, टीम डेविड, मोहम्मद नबी, रोमिरिओ शेफर्ड, श्रेयस गोपाळ, जसप्रीत बुमारह, गेराल्ड कोइत्जे


राखीव खेळाडू -  सूर्यकुमार यादव, डेवॉल्ड ब्रेविस, नमन धीर, वढेरा, हार्विक

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार

पार्श्वभूमी

IPL 2024, MI vs CSK LIVE Score: आयपीएलच्या मैदानात आज मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये एल क्लासिको सामना पाहयला मिळणार आहे. रविवारी होणाऱ्या डबल हेडरमधील हा दुसरा सामना असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता रंगतदार सामना होणार आहे. रोहित शर्मा आणि एमएस धोनी यासारखे दिग्गज खेळाडू आमनेसामने असतील. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील हा 29 वा सामना असेल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.