IPL 2022 Points Table 2022 : दिल्ली कॅपिटल्सनं काल पंजाबचा पराभव करत आपले दोन पॉईंट्स वाढवले आहेत. बुधवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 9 गड्यांनी पराभव केला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पंजाबला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी हे आव्हान 58 चेंडू आणि 9 गडी राखून  सहज पार केले. या विजयानं दिल्लीचे दोन पॉईंट्स वाढले असले तरी गुणतालिकेत फारसा फरक पडलेला नाही. 

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातचा संघ टॉपवर असून आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे.  पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात 6 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह टॉपवर आहे. तर बंगळुरुचा संघ 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थान तिसऱ्या, लखनौ चौथ्या, हैदराबाद पाचव्या स्थानावर आहेत. या तिन्ही संघांचे प्रत्येकी आठ पॉईंट्स आहेत. दिल्ली 6 गुणांसह सहाव्या तर कोलकाता  देखील 6 गुणांसह सातव्या नंबरवर आहे. पंजाबचेही 6 गुण आहेत. पंजाबचा संघ आठव्या स्थानी आहे. चेन्नई दोन गुणांसह नवव्या नंबरवर आहे तर मुंबईला सहा सामन्यांमध्ये अद्यापही गुणांचं खातं उघडता आलेलं नाही.  

आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 32 सामने खेळले गेले आहेत. राजस्थानच्या खेळाडूंकडे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा कब्जा आहे. जोस बटलरनं पाच सामन्यात 375 धावा करत ऑरेंज कॅप राखली आहे तर युजवेंद्र चहलनं 17 विकेट्स घेत  पर्पल कॅपवर कब्जा मिळवला आहे. 

IPL 2022 प्वाईंट्स टेबल:

नंबरटीमसामनेविजयपराभवपॉईंट्स
1GT65110
2RCB75210
3RR642 8
4LSG7438
5SRH6428
6DC6336
7KKR7346
8PBKS7346
9CSK6152
10MI6060
सर्वाधिक धावा जोस बटलरच्या
नंबरफलंदाजसामनेधावा
1जोस बटलर6375
2हार्दिक पांड्या7265
3फाफ डू7250

पर्पल कॅपवर युजवेंद्र चहलचा कब्जा

नंबरगोलंदाजसामनेविकेट
1युजवेंद्र चहल617
2कुलदीप यादव613
3नटराजन612