मुंबई : 2020 च्या आयीपएलचं विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून पुन्हा विजेतेपद मिळवण्यासाठी जोरदार रणनीती राबवण्यात येत आहे. मुंबईनं ट्रेड डील करत तीन खेळाडूंना संघात दाखल करुन घेतलं आहे. तर, तब्बल 17 खेळाडूंना रिटेन केलेलं आहे. त्यामुळं मुंबईची पर्स आता रिकामी झाली आहे. आता ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स केवळ 5 खेळाडूंना खरेदी करु शकते. मुंबईच्या पर्समध्ये 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक आहे.  मुंबई इंडियन्सनं त्यांच्या कोअर टीमला कायम ठेवलं आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा यांच्यासह 17 खेळाडूंना मुंबईनं रिटेन केलं आहे. ट्रेड डील करत मुंबईनं शार्दूल ठाकूर, शरफेन रुदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे यांना संघात घेतलं आहे. मात्र, मुंबई इंडियन्स पुढं ऑक्शनमध्ये अडचणी येऊ शकतात कारण त्यांच्यापर्समध्ये थोडीच रक्कम शिल्लक आहे.  

Continues below advertisement

मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं :

Continues below advertisement

  • सूर्यकुमार यादव
  • रोहित शर्मा
  • तिलक वर्मा
  • रेयॉन रिकेल्टन
  • रॉबिन मिंज
  • हार्दिक पांड्या
  • नमन धीर
  • विल जॅक्स
  • मिशेल सँटनर
  • कॉर्बिन बॉश
  • राज अंगद बावा
  • दीपक चहर
  • जसप्रीत बुमराह
  • ट्रेंट बोल्ट
  • अल्लाह गजनफर
  • अश्वनी कुमार
  • रघू शर्मा

मुंबईनं रिलीज केलेल्या प्लेअरर्सची नावं

  • बेवन जॅकब्स
  • केएल श्रीजीत
  • विग्नेश पुथुर
  • कर्ण शर्मा
  • लिजाद विलियम्स
  • सत्यनारायण राजू
  • मुजीब उर रहमान
  • रईस टॉप्ली

मुंबईच्या पर्समध्ये किती रक्कम?

मुंबई इंडियन्सला आता 2026 आयपीएलसाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये 5 खेळाडू खरेदी करता येतील. कारण मुंबईनं 17 जणांना रिटेन केलं तर 3 खेळाडूंना ट्रेड डीलद्वारे संघात घेतलं. त्यामुळं मुंबईच्या संघात आता 20 खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये एका संघात केवळ 25 खेळाडू असतात.  आयपीएल मिनी ऑक्शनसाठी मुंबईच्या पर्समध्ये 2 कोटी 75 लाख रुपये उरले आहेत. मुंबई आता केवळ एका विदेशी खेळाडूला खरेदी करु शकते तर चार भारतीय खेळाडूंना खरेदी करु शकते.   आयपीएलच्या 19 व्या हंगामासाठी मिनी ऑक्शन डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मिनी ऑक्शन 15 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. त्याचं ठिकाण ठरेललं नाही. यूएईमध्ये ऑक्शन होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मुंबई इंडियन्सला 2026 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवता येणार का ते पाहावं लागेल. मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद दोन वर्षापूर्वी सोपवलं आहे. आता शार्दूल ठाकूरला लखनौ सुपर जायंटसकडून आणि शरफेन रुदरफोर्डला गुजरात टायटन्सकडून ट्रेड डील करत संघात आणलं आहे. मुंबई इंडियन्स मिनी ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूंना खरेदी करणार हे पाहावं लागेल.