IPL 2024 Uncapped Indian Pacer : आयपीएल 2024 स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात पोहचली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच फलंदाजांचा बोलबाला पाहयाला मिळाला. पण स्पर्धा जसजशी पुढे सरकली, गोलंदाजांनीही कमाल दाखवण्यास सुरुवात केली. वेगवान गोलंदाजांनी प्रभावी करत शानदार कामगिरीचं प्रदर्शन केले. यामध्ये काही अनकॅप भारतीय गोलंदाजांचाही समावेश आहे. यामधील चार गोलंदाजांना लवकरच टीम इंडियाचं तिकिट मिळू शकते. होय. या युवा गोलंदाजांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पाहूयात कोण कोणत्या अनकॅप खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळू शकते. 


1- मयंक यादव Mayank Yadav  


लखनौ सुपर जायंट्सच्या मयंक यादव याने आपल्या वेगानं सर्वांनाच चकीत केले. त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रम केला. मयंकला दुखापतीमुळे फक्त चार सामनेच खेळता आले. पण त्याने मोजक्याच सामन्यात आपला प्रभाव दाखवलाय. वेगासोबतच मयंक यादव याने अचूक टप्प्यावर मारा केला. दुखापतीमुळे मयंक यादव सध्या संघाबाहेर आहे. पण त्याने चार सामन्यातच सर्वांना प्रभावित केले. त्याला विश्वचषकाच्या संघात संधी द्या.. या मागणीनेही जोर धरला होता.


2- मोहिसन खान 


लखनौचाच डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खान यानेही आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केले. मोहिसन खान मागील तीन हंगामापासून दर्जेदार गोलंदाजी करत आहे. वेगवान मारा अन् अचूक टप्प्यावर मोहिसन खान यानं गोलंदाजी केली.  मोहिसन खान याने फक्त सात सामन्यात दहा विकेट घेतल्या आहेत. लखनौकडून तो शानदार कामगिरी करत आहे. भविष्यात तो टीम इंडियाचा सदस्य असेल. 


3- हर्षित राणा


कोलकाता नाईट रायडर्सचा युवा वेगवान गोलंदाज हर्षिक राणा यानं सर्वांनाच प्रभावित केलेय. हर्षितने आपल्या गोलंदाजीतील विविधतेमुळे फलंदाजांना त्रस्त केलेय. त्याचा स्लोअर चेंडू भल्याभल्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकतो. त्याच्याविरोधात फटकेबाजी करणं सहज शक्य नाही. हर्षित राणाने 9 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. 


4- रसिख सलाम डार


दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील युवा रसिख सलाम डार यानं सर्वांनाच प्रभावीत केलेय. गोलंदाजी तर अचूक टप्प्यावर करतोच, पण अखेरच्या षटकात मोठे फटके मारण्याची कुवतही त्याच्याकडेच आहे. रसिख सलाम यानं आतापर्यंत सहा सामन्यात सात विकेट घेतल्या आहे. रसिख सलाम अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो.