IPL 2024 Orange cap and Purple cap : आयपीएलच्या मैदानात आज सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाय़ंट्स यांच्यामध्ये काटें का सामना होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. पण मंगळवारी दिल्लीने राजस्थानचा पराभव करत प्लेऑफचं गणित बदलले आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं वादळी अर्धशतक केले. संजू सॅमसन यानं 86 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. सामना जिंकला नाही, पण संजू सॅमसन ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत दाखल झालाय. त्याशिवाय पर्पल कॅपची स्पर्धाही अतिशय रोमांचक झाली आहे.
ऑरेंज कॅपसाठी संजूची दावेदारी -
सध्या विराट कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. पण संजू सॅमसन यानं मंगळवारी 86 धावांची खेळी करत दावेदारी दाखवली आहे. संजू सॅमसन या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
खेळाडू | सामने | धावा | स्ट्राइक रेट |
विराट कोहली | 11 | 542 | 148.09 |
ऋतुराज गायकवाड | 11 | 541 | 147.01 |
संजू सॅमसन | 11 | 471 | 163.54 |
सुनील नारायण | 11 | 461 | 183.67 |
ट्रेविस हेड | 10 | 444 | 189.74 |
विराट कोहलीने आतापर्यंत 11 सामन्यात चार अर्धशतकं आणि एक शतक ठोकले आहे.
ऋतुराज गायकवाड याने आतापर्यंत 11 सामन्यात चार अर्धशतके आणि एक शतक ठोकले.
संजू सॅमसन याने आतापर्यंत पाच अर्धशतके ठोकली आहे. पण त्याला अद्याप एकही शतक ठोकता आले नाही.
पर्पल कॅपसाठीही जोरदार स्पर्धा-
मुंबई इंडियन्सचं यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण पर्पल कॅपच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराहला इतर गोलंदाजांकडून कडवी टक्कर मिळत आहे. टॉप 5 गोलंदाजामध्ये पंजाब किंग्सचे दोन गोलंदाज आहेत.
पाहा संपूर्ण यादी -
खेळाडू | सामने | विकेट | इकॉनमी |
जसप्रीत बुमराह | 12 | 18 | 6.20 |
हर्षल पटेल | 11 | 17 | 9.78 |
वरुण चक्रवर्ती | 11 | 16 | 8.75 |
थंगरासू नटराजन | 9 | 15 | 9.00 |
अर्शदीप सिंह | 11 | 15 | 10.6 |
सर्वात वेगवान 200 षटकार -
संजू सॅमसमन यानं मंगळवारी नव्या विक्रमाला गवसणी घातली. संजू सॅमसन याने आयपीएल 200 षटकाराचा पल्ला पार केला. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 200 षटकार मारण्याचा विक्रम संजू सॅमसन याच्या नावावर जमा झालाय. याआधी हा विक्रम एमएस धोनी याच्या नावावर होता. संजू सॅमसन याने 159 डावात 200 षटकार ठोकले आहेत. तर धोनीने 165 डावात 200 षटकार लगावले होते. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माचा क्रमांक लागतो.
आणखी वाचा :