LSG vs PBKS, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब विरुद्धच्या सामन्यात लखनौ संघानं नवा विक्रम रचला आहे. लखनौने पंजाब विरुद्धच्या सामन्यात 257 धावांचा डोंगर रचला. मात्र सोशल मीडियावर लखनौपेक्षा आरसीबीची जास्त चर्चा होताना दिसत आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली. पंजाब विरोधातील सामना लखनौनं 56 धावांनी जिंकला. या सामन्यातील विजयानंतर लखनौ संघापेक्षाही आरसीबी संघाची जास्त चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा मोठा चाहता वर्ग आहे.

लखनौकडून 257 धावांचा डोंगर

आयपीएल 2023 मधील 38 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने पंजाब किंग्जविरुद्ध एकूण 257 धावा केल्या. काइल मेयर्स आणि मार्कस स्टॉइनिस यांनी लखनौसाठी झटपट अर्धशतके झळकावली, तर आयुष बडोनी आणि निकोलस पूरन यांनी महत्त्वाची खेळी केली. यामुळे लखनौनं 257 धावांचं मोठ आव्हान पंजाब संघासमोर उभ केलं. दरम्यान, यावेळी लखनौ संघानं एक विक्रम रचण्याची संधी थोडक्यात गमावली.

आयपीएलमधील दुसरी सर्वाधिक धावसंख्या; चर्चा मात्र आरसीबीची

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या नावावर आहे. आरसीबीने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावांची खेळी केली आहे. बंगळुरु संघाने 2013 साली पुणे वॉरिअर्स संघाविरोधातील सामन्यात 263 धावा केल्या होत्या. 2013 मधील आरसीबीचा 263 धावांचा विक्रम लखनौ संघाने थोडक्‍यात गमावला.
मात्र, दुसऱ्या सर्वाधिक धावसंख्येचा बंगळुरुचाच विक्रम लखनौनं मोडला आहे. 2016 साली आरसीबीने गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यात 248 ही दुसरी सर्वाधिक धावांची खेळी केली होती, तो विक्रम लखनौनं मोडला 

आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या 

क्र धावसंख्या संघ विरोधी संघ आयपीएल हंगाम
1 263/5 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पुणे वॉरीअर्स 2013
2 257/5 लखनौ सुपर जायंट्स पंजाब किंग्स 2023
3 248/3 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुजरात लायन्स 2016
4 246/5 चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स 2010
5 245/6 कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्स 2018

सोशल मीडियावर लखनौपेक्षा आरसीबीची जास्त चर्चा होताना दिसत आहे. पाहा व्हायरल मीम्स

 

 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

KL Rahul in IPL : लखनौच्या स्टार खेळाडूचा फ्लॉप शो सुरुच, पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर केएल राहुलवर भडकले नेटकरी