KL Rahul Poor Performance in IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील मोहालीमध्ये रंगलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) पंजाब किंग्सचं (Punjab Kings) संघाला नमवलं. लखनौ संघाने पंजाब विरुद्धचा हा सामना 56 धावांनी जिंकला. दरम्यान, हा सामना जिंकल्यानंतरही लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुलवर जोरदार टीका होताना दिसत आहे. लखनौ संघाने पंजाबवर दणदणीत विजय मिळवला. पण या विजयासाठी कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) काही खास कामगिरी करता आली नाही. केएल राहुलचा फ्लॉप शो सुरुच आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलच ट्रोल केलं आहे. 


केएल राहुलचा फ्लॉप शो सुरुच


लखनौ विरोधातील सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात लखनौच्या स्टार खेळाडूने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. लखनौचा स्टार फलंदाज आणि कर्णधार केएल राहुलचा डाव थोडक्यात आटोपला. केएल राहुल अवघ्या 12 धावा करून तंबूत परतला. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर या खेळाडूला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


केएल राहुलमुळे संघाची अडचण वाढती


स्टार फलंदाज लवकर बाद होत असल्यामुळे त्यानंतरच्या फलंदाजांवर दबाव वाढताना दिसून येतो. अशातही संघ समाधानकारक कामगिरी करताना दिसत आहे. पण केएल राहुलने संघासाठी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आयपीएल 2023 मध्ये संथ खेळीमुळेही राहुलला लक्ष्य करण्यात आलं आहे. या कारणामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.


यंदाच्या हंगामात केएल राहुलचा खराब फॉर्म


आयपीएल 2023 मध्ये लखनौ संघांची कामगिरी चांगली आहे. पण आतापर्यंतच्या सामन्यात कर्णधार केएल राहुलची बॅट चाललेली नाही. राहुलसाठी मैदानावर टिकणं फार अवघड झालं आहे. केएल राहुलने आयपीएल 2023 मध्ये सात सामने खेळले आहे. त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत 8, 20, 35, 18, 74, 39, 68 आणि 12 धावांची खेळी केली आहे. 


केएल राहुलच्या खराब खेळीमुळे नेटकऱ्यांनी त्याचा सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत मीम्स शेअर करताना दिसत आहेत.






 






 






 






 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : अर्रर्रर्र... अर्जुननं भर मैदानात हे काय केलं? नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात; तुम्हीही पाहा Video