RCB vs LSG, IPL 2023 Live : रोमांचक लढतीत लखनौचा विजय
IPL 2023, Match 15, RCB vs LSG : आरसीबी विजयाच्या पटरीवर परतण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लखनौ आपली विजयी लय कामय राखण्यासाठी मैदानात उतरेल.
रोमांचक लढतीत लखनौचा विजय
पूरनची विस्फोटक खेळी संपली.. 19 चेंडूत 62 धावा करुन झाला बाद
लखनौला विजयासाठी 24 चेंडूत 28 धावांची गरज
निकोलस पूरन याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले
निकोलस पूरन याची वादळी फलंदाजी.. 12 चेंडूत 5 षटकारासह 40 धावांवर खेळत आहे.
केएल राहुल 18 धावांवर बाद झालाय. सिराजच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला झेल
लखनौला मोठा धक्का, स्टॉयनिस वादळी खेळीनंतर बाद
स्टॉयनिसचे वादळी अर्धशतक
लखनौला लागोपाठ दोन धक्के, दीपक हुड्डानंतर कृणाल पांड्या बाद
लखनौला पहिला धक्का, काइम मायर्स बाद.. सिराजने पाठवले तंबूत
आरसीबीची 212 धावांपर्यंत मजल
मॅक्सवेल अर्धशतकानंतर बाद, मार्क वूडने घेतली विकेट
आरसीबीच्या 200 धावा
मॅक्सवेल-फाफ यांनी 44 चेंडूत शतकी भागिदारी केली.
ग्लेन मॅक्सवेल याने 24 चेंडूत अर्धशतक केलेय
विराट कोहलीनंतर फाफ डु प्लेसिस याने अर्धशतक झळकावले
अर्धशतकानंतर विराट कोहली बाद झाला आहे. त्याने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली.
अर्धशतकानंतर विराट कोहली बाद
फाफ विराटची दमदार सुरुवात... तीन षटकात 25 धावा
आरीसीबीची फलंदाजी सुरु... विराट कोहली आणि फाफ सलामीला
केएल राहुल (कर्णधार), काइल मायर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन, जयदेव अनाडकद, अमित मिश्रा, आवेश खान, मार्क वूड, रवि बिश्नोई
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), मोहिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अनुज रावत, डेविड विली, वेन पार्नेल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
इरफान पठाण याच्या मते विराट कोहलीने सलामीला येऊ नये. विराट कोहली त्याच वेगाने धावा काढेल आणि संघाला विजय मिळवून देईल, याची शाश्वती नाही. कोलकात्याकडून 81 धावांनी पराभव झाल्यानंतर इरफान पठाण याने आरसीबीला हा सल्ला दिलाय. या सामन्यात विराट कोहली फक्त 21 धावांचे योगदान देऊ शकला. इरफान पठाण म्हणाला की, यंदाचा हंगाम आरसीबीसाठी वेगळा वाटतोय. कारण, विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत आहेत. अशा परिस्थितीत उतर फलंदाजांपुढे धावा काढण्याचे मोठे आव्हान असू शकते. विराट कोहली एखाद्या सामन्यात लवकर बाद झाला, तर इतर फलंदाजांनी तयार राहायला हवे. त्यामुळे माझ्या मते विराट कोहलीने सलामीला येऊ नये.
लखनौ सुपर जायंटस् (LSG) आणि कोलकाता नाईट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. आरसीबी संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. दुसरीकडे, लखनौने पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव केला तर, संघाला दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला.
आज संध्याकाळी 7.30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात लढत होणार आहे. बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंटस् (Lucknow Super Giants) यांच्यात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये आरसीबीचं पारड जड होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध (LSG vs RCB) दोन्ही सामने जिंकले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर जायंटस् (LSG) यांच्यात 10 एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.
पार्श्वभूमी
Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Match Prediction : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंटस् (Lucknow Super Giants) यांच्यात रणसंग्राम पाहायला (RCB vs LSG) मिळणार आहे. हा यंदाच्या मोसमातील पंधरावा (IPL 2023 Match 13) सामना असेल. बंगळुरुमध्ये 10 एप्रिल रोजी, सोमवारी एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M Chinnaswamy Stadium) सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. लखनौ संघाचा हा चौथा सामना तर, आरसीबीचा तिसरा सामना असेल. (IPL 2023 Match 15 LSG vs RCB)
RCB vs LSG Match 11 Preview : बंगळुरु विरुद्ध लखनौ
लखनौ सुपर जायंटस् (LSG) आणि कोलकाता नाईट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. आरसीबी संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. दुसरीकडे, लखनौने पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव केला तर, संघाला दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला.
RCB vs LSG Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंटस् (Lucknow Super Giants) यांच्यात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये आरसीबीचं पारड जड होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध (LSG vs RCB) दोन्ही सामने जिंकले आहेत.
M Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?
आज संध्याकाळी 7.30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात लढत होणार आहे. बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.
IPL 2023 Match 15 : कधी आणि कुठे होणार सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर जायंटस् (LSG) यांच्यात 10 एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -