LSG vs MI, IPL 2023 Live: लखनौ आणि मुंबई यांच्यात काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

LSG vs MI Score Live Updates : आज आयपीएलच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स भिडणार आहेत.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 16 May 2023 11:17 PM
मुंबईचा अर्धा संघ तंबूत

 


विष्णून विनोद बाद झालाय. दोन धावांवर तंबूत परतला.

मुंबईला चौथा धक्क

 


नेहल वढेराच्या रुपाने मुंबईला चौथा धक्का बसलाय. वढेरा 16 धावांवर बाद झालाय. 

सुर्यकुमार यादव बाद

सुर्यकुमार यादव आठ धावांवर बाद झालाय.

पांड्याचा भेदक मारा

कृणाल पांड्याने चार षटकात 27 धावांचा खर्च केल्या. पांड्याला विकेट घेण्यात अपयश आले . पण धावा रोखण्याचे काम त्याने केले.

मुंबईला दुसरा धक्का

ईशान किश 59 धावांवर बाद झालाय.. रवि बिश्नोईने घेतली विकेट

मुंबईची दमदार सुरुवात

ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा 37 धावांवर बाद झालाय. ईशान किशन 59 धावांवर खेळत आहे.

लखनौची 177 धावांपर्यंत मजल

लखनौची 177 धावांपर्यंत मजल

मार्कस स्टॉयनिस .याचे वादळी अर्धशतक

मार्कस स्टॉयनिस .याचे वादळी अर्धशतक झळकावलेय... स्टॉयनिस याने लखनौचा डाव सावरला

कृणाल पांड्या रिटार्यटहर्ट

49 धावांवर फलंदाजी करणारा कृणाल पांड्या रिटार्यटहर्ट झालाय...  निकोलस पूरन फलंदाजीसाठी मैदानात उतरलाय

लखनौचे शतक पूर्ण

कर्णधार कृणाल पांड्या आणि स्टॉयनिसच्या दमदार खेळीच्या बळावर लखनौने 100 धावांचा पल्ला पार केलाय

पांड्या-स्टॉयनिसची जोडी जमली

पांड्या-स्टॉयनिसची जोडी जमली... कृणाल पांड्या कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत आहे.. स्टॉयनिस त्याला उत्तम साथ देत आहे.

क्विंटन डि कॉक बाद

क्विंटन डि कॉक 16 बाद झालाय.. कृणाल पांड्या आणि स्टॉयनिस यांनी डाव सावरला

लखनौला दुसरा धक्का

लखनौला दुसरा धक्का बसलाय... बेहरनड्रॉफने मंकला केले बाद

लखनौला पहिला धक्का, हुड्डा बाद झालाय

लखनौला पहिला धक्का, हुड्डा बाद झालाय... बेहरनड्रॉफने घेतली विकेट

डिकॉक-हुड्डा सलामीला

डिकॉक-हुड्डा सलामीला आलेत..

लखनौ सुपर जायंट्स

 - क्विंटन डिकॉक (विकेटकिपर ), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, आयुष बडोनी, कृणाल पांड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, आर. बिश्नोई, स्वप्निल सिंह, मोसीन खान, नवीन उल हक

मुंबईने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणफेक जिंकली

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 63, LSG vs MI:  आयपीएल 2023 मधील आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. काल गुजरात विरुद्ध हैदराबादच्या सामन्यात विजय मिळवत गुजरातनं प्लेऑफचं तिकीट मिळवलं. आजच्या सामन्यात लखनौ आणि मुंबई यांच्यातील प्लेऑफमध्ये कोण धडक देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघ पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत, पण आजचा सामना बरंच काही बदलू शकतो. चला जाणून घेऊया प्लेऑफच्या शर्यतीचे समीकरण काय आहे आणि आजच्या सामन्याची खेळपट्टी कशी असेल त्याबाबत सविस्तर... 


हेड टू हेड 


आजचा सामना लखनौ सुपर जायंट्सचं होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर होणार आहे. लखनौचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 सामने गमावले आहेत, 1 सामना अनिर्णित राहिला आहे, ज्यामुळे त्यांचे 13 गुण आहेत. आणि लखनौच्या वर म्हणजे, मुंबई इंडियन्स आहे, ज्यांनी 12 सामन्यांत 7 सामने जिंकले आहेत, 5 सामने गमावले आहेत आणि 14 गुण आहेत. जर लखनौनं मुंबईला पराभूत केलं तर त्यांचे 15 गुण होतील आणि ते तिसऱ्या क्रमांकावर येतील. पण जर मुंबई जिंकली तर त्यांचे 16 गुण होतील आणि ते चेन्नईला तिसर्‍या स्थानावर नेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. 


लखनौमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार 


लखनौच्या एकना स्टेडियमवर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत फक्त मुंबईतच सामने झाले आहेत. अशा स्थितीत आज लखनौला घरच्या मैदानाचा फायदा घेता येईल. लखनौनं आजचा सामना गमावला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्याचवेळी सामना गमावल्यानंतरही मुंबईला संधी असेल. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.


मुंबई इंडियंस विरुद्ध लखनौ सुपर जायन्ट्सची प्लेइंग इलेव्हन 


मुंबई इंडियंसची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 


पहिल्यांदा फलंदाजी : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, टिम डेविड, कॅमरून ग्रीन, ट्रिस्टन स्टब्स, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडोर्फ 


पहिल्यांदा गोलंदाजी : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, टिम डेविड, कॅमरून ग्रीन, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडोर्फ, कुमार कार्तिकेय. 


इम्पॅक्ट प्लेयर्स : कुमार कार्तिकेय, अरशद खान, ट्रसिटन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस.


लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 


पहिल्यांदा फलंदाजी : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कायल मेयर्स, क्रुणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टोयनिस, आयुष बदोनी, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवि बिश्नोई, युद्धवीर सिंह चरक.


पहिल्यांदा गोलंदाजी : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कायल मेयर्स, क्रुणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवि बिश्नोई, युद्धवीर सिंह चरक आवेश खान.


इम्पॅक्ट प्लेयर्स : आवेश खान, आयुष बडोनी, डेनियल सॅम्स.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.