LSG Vs GT LIVE Score Updates, IPL 2024 :लखनौनं गुजरातवर मिळवला दणदणीत विजय, गुणतालिकेत उलटफेर

Lucknow Super Giants Vs Gujarat Titans LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमधील 21 वी मॅच लखनौ सुपर जाएंटस आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

युवराज जाधव Last Updated: 07 Apr 2024 11:14 PM
अभ्यास केला मयंकचा पेपर आला यश ठाकूर कृणाल पांड्याचा, लखनौचा गुजरातवर दणदणीत विजय

लखनौ सुपर जाएंटसनं यंदाच्या आयपीएलमधील सलग तिसरा विजय मिळवला आहे. आयपीएलमध्ये त्यांनी गुजरातला पहिल्यांदा पराभूत केलं आहे.

गुजरातला सहावा धक्का, विजय शंकर 17 धावांवर बाद

गुजरातला सहावा धक्का बसला असून विजय शंकर 17 धावांवर बाद झाला आहे. त्याला यश ठाकूरनं बाद केलं. 

गुजरातला पाचवा धक्का, दर्शन नाळखंडे 12 धावांवर बाद 

गुजरातला लखनौच्या बॉलर्सनी धक्का दिला आहे. गुजरातची पाचवी विकेट गेली आहे. दर्शन नाळखंडे 12 धावांवर बाद झाला आहे.

गुजरातला चौथा धक्का, बीआर शरथ बाद 

गुजरातला लखनऊच्या गोलंदाजांनी चौथा धक्का दिला. 10 ओव्हरअखेर गुजरातनं 4 विकेटवर 67 धावा केल्या आहेत.

गुजरातला तिसरा धक्का, साई सुदर्शन 31 धावा करुन बाद

गुजरातला तिसरा धक्का बसला आहे. साई सुदर्शन 31 धावा करुन बाद झाला असून कृणाल पांड्यानं त्याची विकेट घेतली आहे.

गुजरातला दुसरा धक्का, विलियमन्सन बाद

गुजरातला दुसरा धक्का बसला आहे. केन विलियमन्सन 1 रन करुन बाद  झाला आहे. रवि बिश्नोईनं त्याला बाद केलं.

गुजरातला पहिला धक्का, शुभमन गिल 21 धावा करुन बाद

गुजरातला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल  21 धावा करुन बाद झाला आहे. 

लखनौला पाचवा धक्का, आयुष बदोनी 20 धावांवर बाद

लखनौ सुपर जाएंटसला पाचवा धक्का बसला आहे. आयुष बदोनी 20 धावांवर बाद झाला आहे. 

मार्कस स्टॉयनिस 58 धावा करुन बाद, गुजरातचं वर्चस्व

लखनौला मोठा धक्का बसला आहे. मार्कस स्टॉयनिस  58 धावा करुन बाद झाला आहे. लखनौनं  15 ओव्हरमध्ये 4 बाद 114 धावा केल्या आहेत.

लखनौच्या 100 धावा पूर्ण ,स्टॉयनिसचं अर्धशतक

लखनौ सुपर जाएंटसनं 15 व्या ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या आहेत.  दुसरीकडे स्टॉयनिसनं अर्धशतक केलं आहे. 

लखनौला तिसरा धक्का, के.एल. राहुल बाद

लखनौला तिसरा धक्का बसला आहे. के.एल. राहुल 33 करुन बाद झाला आहे. 

लखनौची सावध सुरुवात,पॉवर प्लेमध्ये दोन धक्के

लखनौनं सावध सुरुवात केली आहे. लखनौला पहिल्या सात ओव्हरमध्ये दोन धक्के बसले आहेत. सातव्या ओव्हरपर्यंत त्यांनी 2 बाद  54 धावा केल्या आहेत. 

गुजरातला पहिला धक्का, क्विंटन डी कॉक बाद

गुजरातला पहिला धक्का बसला असून क्विंटन डी कॉक 6 धावा करुन बाद झाला आहे. उमेश यादवनं त्याला बाद केलं.  

लखनौचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

लखनौनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौनं यापूर्वी दोन मॅच जिंकल्या आहेत. 

पार्श्वभूमी

LSG Vs GT LIVE Score Updates, IPL 2024 :लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज आयपीएलमधील 21 वी मॅच होत आहे. लखनौला आणि गुजरातला आज तिसऱ्या विजयाची संधी आहे. लखनौनं आतापर्यंत तीन पैकी दोन मॅच जिंकल्या आहेत. दुसरीकडे गुजरात टायटन्सला  चार पैकी दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.    

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.