LSG vs RR Probable Playing XI And Pitch Report: आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज दोन सामने खेळवले जाणार आहे. यामधील पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचा होणार आहे. जयपूरमधील एस. मानसिंग मैदानावर राजस्थान आणि लखनौची लढत रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरु होईल. लखनौ आणि राजस्थान आज कोणते खेळाडू मैदानात उतरवरणार? खेळपट्टी कशी असेल?, जाणून घ्या...
खेळपट्टी कशी असेल?
एस. मानसिंग मैदानाच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. या विकेटवर फलंदाज सहज धावा करतात. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याशिवाय या विकेटवर सलग 200 हून अधिक धावा केल्या आहेत. या मैदानावर संघांना धावांचा पाठलाग करण्यास आवडते. आतापर्यंत झालेल्या 52 आयपीएल सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 34 वेळा विजय मिळवला आहे.
तीनदा आमने-सामने
आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये तीनदा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने 2 वेळा विजय मिळवला आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने 1 विजय नोंदवला आहे. अशाप्रकारे, लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
लखनौ सुपर जायंट्सच्या या खेळाडूंवर नजरा-
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर या संघाचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि देवदत्त पडिक्कल असू शकतात. तर मधल्या फळीत दीपक हुडा, केएल राहुल, निकोलस पुरन आणि आयुष बडोनीसारखे फलंदाज असतील. याशिवाय मार्कस स्टॉइनिस आणि कृणाल पंड्या हे अष्टपैलू म्हणून खेळतील. तर गोलंदाजीची जबाबदारी नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांच्यावर असेल.
लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, दीपक हुडा, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई.
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करेल-
राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या हाती असेल. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर असू शकतात. यानंतर संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि ध्रुव जुरेलसारखे फलंदाज असतील. त्याचबरोबर या संघात रवी अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट हे गोलंदाज म्हणून दिसणार आहेत.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, ध्रुव जुरेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट.