IPL 2023 Update :  आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन 31 मार्चपासून सुरू होत आहे. या सामन्यांसाठी सर्वचजण उत्सुक असून केकेआरसह आता सर्व संघांनी त्यांच्या कर्णधारांची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीसारखे खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधार म्हणून कायम राहतील. त्याचबरोबर आयपीएल 2023 मध्ये अनेक संघांचे कर्णधार बदललेले दिसणार आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. तर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.


हे खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधार असतील


हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार असेल. यापूर्वी IPL 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले होते. IPL 2022 हा गुजरात टायटन्सचा पहिला हंगाम होता. त्याचबरोबर फाफ डू प्लेसिस हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असेल. फाफ डु प्लेसिस हा आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार होता. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडे असेल. लखनौ सुपर जायंट्सची कमान केएल राहुलच्या हाती असेल.


हे आहेत नवे कर्णधार


तसंच कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणाला आयपीएल 2023 साठी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला ज्यामुळे तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या जागी नितीश राणाला संघाचा कर्णधार बनवले आहे. पंजाब किंग्जची कमान शिखर धवनच्या हाती असेल. तर सनरायझर्स हैदराबादने एडन मार्करामला संघाचा कर्णधार बनवले आहे. यासाठी डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.


आयपीएल 2023 नवीन नियम


बीसीसीआयने या आयपीएल हंगामात काही नवीन नियम केले आहेत. या नियमामुळे संघाच्या पराभव आणि विजयात मोठा फरक पडू शकतो. या नवीन नियमानुसार, नाणेफेकीच्या वेळी संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूचा कर्णधार सामन्यादरम्यान स्पेशल खेळाडू म्हणून वापर करू शकतो. ज्याला 'इम्पॅक्ट प्लेअर' असं म्हटलं जात असून हा खेळाडू म्हणून, कर्णधार 4 पर्यायी खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूसह बदलू शकतो. रिटायर्ड हर्ट प्लेअरच्या जागी 'इम्पॅक्ट प्लेअर'ही बॅटिंगला येऊ शकतो. दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू वापरू शकतात. जर संघात 4 परदेशी खेळाडू खेळत असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.


हे देखील वाचा-