RR vs LSG, IPL 2024 : जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) यांच्यामध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर संजू सॅमसन आणि केएल राहुल यांनी केलेली स्टेटमेंट चर्चेचा विषय आहे. विशेषकरुन केएल राहुल यानं दुखापतीबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मागील दोन वर्षांपासून दुखापत बेस्ट फ्रेंड झाल्याचं मिश्लिक वक्तव्य केएल राहुल यानं केलेय.
केएल राहुल यानं अनेक दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केलेय. याआधी त्याला दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय सामन्याला मुकावं लागलं होतं. गेल्यावर्षी आयपीएलदरम्यान केएल राहुल याला दुखापत झाली होती. चार महिन्यानंतर त्यानं आशिया चषकाद्वारे कमबॅक केले होते. विश्वचषकानंतर केएल राहुल याला पुन्हा दुखापत झाली होती. त्यानंतर त्यानं आता कमबॅक केले आहे. सामन्यापूर्वी केएल राहुल यानं दुखापतीवर केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
नाणेफेकीनंतर केएल राहुल काय म्हणाला ?
लखनौचा कर्णधार केएल राहुल नाणेफेकीनंतर म्हणाला की, जर नाणेफेक जिंकली असती तर नक्कीच फलंदाजी घेतली असती. खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे. मैदानावर कमबॅक केल्यानंतर खूश आहे. पण मागील दोन वर्षांपासून दुखापत बेस्ट फ्रेंड झाली होती. पण ज्यावेळी दुखापतीनंतर कमबॅक करत असाल तर चांगली कामगिरी करण्याची जिद्द वाढलेली असते. आम्ही क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस आणि नवीन उल हक हे चार विदेशी खेळाडू उतरवत आहोत. सध्या माझं सर्व लक्ष आजच्या सामन्यावर आहे.
नाणेफेकीनंतर काय म्हणाला संजू सॅमसन -
नाणेफेकीनंतर संजू सॅमसन म्हणाला की, फलंदाजीसाठी खेळपट्टी पोषक दिसत आहे, आम्ही प्रथम फलंदाजी करतो, ही चांगली गोष्ट आहे. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी तयार होतो. आमच्याकडे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत. जयपूरमध्ये परत आल्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण सकारात्मक असल्याचं दिसतेय. रियान पराग चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. जॉस बटलर, हेटमॉयर आणि बोल्ट हे विदेशी खेळाडू असतील. पॉवेल इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरु शकतो.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन):
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर