IPL 2023 Arjun Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) पदार्पण केलं. अर्जुनने त्याच्या खेळाने आतापर्यंत प्रभावित केलं आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) पदार्पण करताना अर्जुननं आतापर्यंत चार सामन्यांत तीन विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 9.36 च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्यामुळे अर्जुन तेंडुलकरवर नेहमीच सर्वांच्या नजरा असतात.


अर्रर्रर्र... अर्जुननं भर मैदानात हे काय केलं? 


आता अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण, सध्या अर्जुन त्याच्या गोलंदाजीमुळे नाही तर वेगवेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडिया यूजर्स त्याला खूप ट्रोल करत आहेत.


नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात


व्हिडीओमध्ये अर्जुन एखाद्या लहान मुलाप्रमाणे वर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तर अनेकांनी डोक्यावर हात मारला आहे. आयपीएलमधील सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बालिश कृतीमुळे नेटकरी त्याला खूप करताना पाहायला मिळत आहे. अर्जुनचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही युजरने कमेंट करत लिहिलं की, 'अर्जुनला भूक लागली असेल' तर दुसऱ्या युजरने प्रश्न विचारत लिहिलं की 'आणखी भाऊ! चव आली?'


पाहा अर्जुन तेंडुलकरचा व्हायरल व्हिडीओ : 




या व्हायरल व्हिडीओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.




 




 




 




 




 


 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरने कॅमेरामनला केली शिवीगाळ? मास्टर ब्लास्टर सचिनच्या 'लेका'चा व्हिडीओ व्हायरल