कोलकाता : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वातील तिसरा सामना ईडन गार्डन्सवर होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात ही लढत होतं आहे. सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. होम ग्राऊंडवर फलंदाजी करणाऱ्या कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. कोलकाताची टॉप ऑर्डर स्वस्तात बाद झाली. सलामीवीर फिल सॉल्टनं एका बाजूनं कोलकाताचा डाव सावरला आहे. सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर हे लवकर बाद झाले. कॅप्टन श्रेयस अय्यर तर गोल्डन डक झाला. 


कोलकाताची निराशाजनक सुरुवात


कोलकाता नाईट रायडर्सला पहिला धक्का सुनील नरेनच्या विकेटमुळं बसला.दुसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर फिल सॉल्टनं शॉट मारल्यानंतर दुसऱ्या बाजूनं धाव घेणारा सुनील नरेन शहाबाज अहमदच्या अफलातून थ्रोमुळं धावबाद झाला. 


श्रेयस अय्यर शुन्यावर बाद


टी. नटराजन यानं कोलकाताच्या टीमला मोठा धक्का दिला. नटराजन यानं व्यकंटेश अय्यरला 7 धावांवर बाद केलं. तर, श्रेयस अय्यर देखील शुन्यावर बाद झाला आहे. कोलकाताच्या टीमला चौथा धक्का बसला असून नितीश राणा देखील ९ धावा करुन बाद झाला. 



फिल सॉल्टनं डाव सावरला


कोलकाताचा सलामीवीर फिल सॉल्ट यानं एका बाजूनं किल्ला लढवण्याचं काम केलं आहे. आठव्या ओव्हरपर्यंत कोलकाता नाईट रायडर्सनं 4 बाद 51 धावा केल्या आहेत.


कोलकाता की हैदराबाद कोण विजयानं सुरुवात करणार?


कोलकाता नाईट रायडर्सनं आतापर्यंतच्या १६ आयपीएल स्पर्धांमध्ये दोन वेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. दुसरीकडे हैदराबादच्या टीमनं 2016 मध्ये एकदा विजेतेपद पटकावलं आहे. हैदराबादची जुनी फ्रँचायजी डेक्कन चार्जर्सनं 2009 मध्ये विजेतेपद मिळवलं होता. कोलकाता नाइट रायडर्सनं 2012 आणि 2014 च्या स्पर्धेत विजेतेपद मिळवलं होतं. कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघांना गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आज सुरु असलेल्या मॅचमध्ये कोलकाता की हैदराबाद नेमका कोणता संघ विजयानं सुरुवात करणार हे पाहावं लागेल. 


कोलकाताच्या टीमला होम ग्रांऊडवर विजय मिळणार?


कोलकाताच्या टीमसाठी आयपीएलची पहिली मॅच त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या ईडन गार्डन्स मैदानावर होत आहे. 17 व्या आयपीएलमधील पहिल्या दोन मॅच  होम ग्राऊंड असलेल्या टीमनं जिंकलेल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जनं विजय मिळवला आहे. त्यामुळं आता कोलकाता नाईट रायडर्स विजय मिळवून सुरुवात करणार की सनरायजर्स हैदाराबाद धक्का देणार हे पाहावं लागणार आहे. 


संबंधित बातम्या: 


 PBKS vs DC : पंजाबच्या ओपनर्सची आक्रमक सुरुवात, इशांत शर्मानं कसा लावला ब्रेक,जाणून घ्या


KKR vs SRH : सर्वात महागड्या खेळाडूचं KKR संघात पदार्पण, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11