Kane Williamson Diamond Duck : वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 192 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरणाऱ्या हैदराबादचा संघ वानंदु हसरंगाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. हसरंगाच्या फिरकीपुढे हैदराबादचा डाव 125 धावांत संपुष्टात आला. या सामन्यात केन विल्यमसनला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. विल्यमसन शून्य धावा काढून माघारी परतला. 


192 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 125 धावांपर्यंत मजल मारु शकला. धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. हैदराबादला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. अभिषेक शर्मा डक बाद झाला तर कर्णधार केन विल्यमसन डायमंड डक झाला. दोघांनाही खातेही उघडता आले नाही. कर्णधार केन विल्यमसन एकही चेंडू न खेळता बाद झाला. 


आरसीबीकडून मॅक्सवेल पहिले षटक घेऊन आला होता. पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने कट करुन धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण कव्हरवर उभा असणाऱ्या शाहबाद अहमदने अचूक थ्रो केला, दिनेश कार्तिकने चपळाईन स्टम्प पाडल्या.... अन् केन विल्यमसन एकही चेंडू न खेळता बाद झाला. केन विल्यमसनला खातेही उघडता आले नाही. विल्यमसन डायमंड डकचा शिकार झाला. यंदाच्या हंगामातील हा दुसरा डायमंड डक होय. शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलही डायमंड डक झाला होता. 
 













डायमंड डक म्हणजे काय रे भाऊ?
क्रिकेटमध्ये जेव्हा फलंदाज खातेही न उघडता बाद होतो, त्याला डक म्हटले जाते. त्याशिवाय पहिल्याच चेंडूवर बाद होणाऱ्या खेळाडूला गोल्डन डक बाद झाला असे म्हटलेय जातेय. तर एकही चेंडू न खेळता बाद झाल्यास डायमंड डक म्हटले जाते. म्हणजेच, एखादा फलंदाज नॉनस्ट्राईकला असेल, अन् धाव घेताना खातेही न उघडचा बाद झाला तर तर डायमंड डक झाला असे म्हटले जाते.  


हे देखील वाचा-