Vaibhav suryavanshi Age News : मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक खेळी खेळली आणि 35 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला. तो टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुजरात टायटन्सचे मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, करीम जनात आणि प्रसीद्ध कृष्णासारखे स्टार गोलंदाज फेल ठरले. सगळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात पण तरीही वैभवसमोर ते काहीही करू शकले नाहीत
वैभवचे वय 14 वर्षे असल्याचे सांगितले जाते. पण याआधी माजी पाकिस्तानी खेळाडू जुनैद खाननेही वैभववर वयाच्या फसवणुकीचा आरोप केला होता. अशा परिस्थितीत, प्रत्येकाच्या मनात प्रश्न असा आहे की वैभव खरोखरच 14 वर्षांचा आहे का?
आयपीएलपूर्वी वैभव 2024 मध्ये एसीसी अंडर-19 क्रिकेट आशिया कपमध्ये भारतीय संघाकडून खेळत होता. या काळात त्याने 44 च्या प्रभावी सरासरीने 176 धावा केल्या. माजी पाकिस्तानी खेळाडू जुनैदला वैभवची दमदार कामगिरी पचवता आली नाही आणि त्याने प्रश्न उपस्थित केला की 13 वर्षांच्या मुलामध्ये इतकी ताकद असू शकते का? त्यानंतर वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्यावरील वयाच्या फसवणुकीच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.
वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी त्यांनी सांगितले की, वैभव 8 वर्षांचा असताना त्याची अधिकृत हाडांची चाचणी करण्यात आली. ही चाचणी फक्त तरुण खेळाडूंचे वय तपासण्यासाठी केली जाते. अशा परिस्थितीत, वैभवचे वडील संजीव यांनी दिलेल्या उत्तरांवरून असे दिसून येते की वैभव खरोखरच फक्त 14 वर्षांचा आहे. वैभवचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. वैभव आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. वैभवच्या इथपर्यंतच्या प्रवासात त्याच्या पालकांचा मोठा वाटा आहे.
वैभवने चार वर्षाचा असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यानंतर, वयाच्या नवव्या वर्षी, त्याच्या वडिलांनी वैभवला समस्तीपूरमधील क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश दिला. वैभवची आई रात्री 11 वाजता झोपायची आणि पहाटे 2 वाजता उठायची. ती रात्री उशिरा उठून वैभवसाठी जेवण बनवायची. कारण वैभवला सकाळी लवकर सरावासाठी जायचे होते. वैभवच्या क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता यावे म्हणून त्याच्या वडिलांनी नोकरी सोडली. त्याचा मोठा मुलगा त्याच्या वडिलांचे सर्व काम पाहू लागला.
वैभवचे घर मोठ्या मुश्किलीने चालत होते. पण त्याच्या वडिलांना खात्री होती की वैभव ते करेल. वैभवने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नाराज नाही केले. 2025 च्या आयपीएलमध्ये राजस्थानने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने बिहारच्या 19 वर्षांखालील रणधीर वर्मा स्पर्धेत नाबाद 332 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्ध भारताकडून खेळताना त्याने 58 चेंडूत शतक झळकावले.