IPL 2023, KKR vs PBKS : अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना रिंकू सिंह याने चौकार लगावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला. आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांच्या वादळी फलंदाजीमुळे कोलकात्याने पंजबाचा पराभव केला. पण कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याला आर्थिक दंडाचा सामना करावा लागलाय. स्लो ओव्हर रेटमुळे नीतीश राणा याला आयपीएल समितीने आर्थिक दंड ठोठावलाय. 


आयपीएलने अधिकृत संकेतस्थळावर नीतीश राणा याला दंड झाल्याची माहिती दिली आहे. कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्यानंतर कर्णधार नीतीश राणा याला स्लो ओव्हर रेटमुळे दंड आकारण्यात आला आहे. इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात कोलकात्याने निर्धारित वेळेत 20 षटकांची गोलंदाजी पूर्ण केली नाही. नीतीश राणा याने आपली चूक मान्य केली आहे. त्याशिवाय नीतीश राणा याच्याकडून ही पहिल्यांदाच चूक झाली आहे. नीतीश राणा याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  










अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने थरारक विजय मिळवला. अखेरच्या दोन चेंडूत 26 धावांची गरज होती. 19 व्या षटकात आंद्रे रसेल याने तीन षटकार लगावत कोलकात्याच्या विजयाच्या आशा उंचावल्या. पण अखेरच्या षटकात सहा धावांची गरज असताना अर्शदीप याने भेदक मारा केला.. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार कोलकात्याने जिंकला. पण अर्शदीप याच्या गोलंदाजीचेही कौतुक केलेय जातेय. रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना आंद्रे रसेल धावबाद झाला.. त्यामुळे रिंकूवर दबाव होता.. पण रिंकूने दबाव न घेता अर्शदीपच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकात्याला विजय मिळवू दिला. नीतीश राणा याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. नीतीश राणा याने 38 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. रामा याने या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. नीतीश राणा बाद झाल्यानंतर आंद्रे रसले याने स्वर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. आंद्रे रसेल याने रिंकूच्या साथीने कोलकात्याला विजायाकडे नेले. अखेरच्या षटकात दोन चेंडूवर दोन धावांची गरज असताना रसेल धावबाद झाला. रसेल याने 23 चेंडूत तीन षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 42 धावांचे योगदान दिले. रसेल बाद झाल्यानंतर रिंकूने चौकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. रिंकूने 10 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकार लगावत विजयी खेळी केली. रिंकू सिंह पुन्हा एकदा कोलकात्याच्या मदतीला धावून आला.