IPL 2022 मध्ये आतापर्यंत 56 सामने झाले आहेत. यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे...तर धोनी-कार्तिकसारख्या अनुभवी खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केलेय. पण काही खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली आहे. या खेळाडूंचा हा आयपीएलचा अखेरचा हंगाम ठरु शकतो.. यामध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कायरन पोलार्डपासून गुजरात टायटन्सच्या मनिष पांडेचा समावेश आहे. पाहूयात कोण आहेत ते खेळाडू....
कायरन पोलार्ड -
वेस्ट विंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला मुंबई इंडियन्सने रिटेन केले होते. पण यंदाच्या हंगामात पोलार्डला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कायरन पोलार्डने यंदाच्या हंगामात 11 सामन्यात 15 च्या सरासरीने आणि 112 च्या स्ट्राईक रेटने फक्त 136 धावा केल्या आहेत. पोलार्डला आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. यंदाच्या हंगामात पोलार्डची सर्वोच्च खेळी 25 धावांची आहे...
विजय शंकर
3D विजय शंकरला यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही. अष्टपैलू विजय शंकरला फलंदाजीत आणि गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आली नाही. गुजरातने विजय शंकरसाठी कोट्यवधी रुपये मोजले आहेत. मात्र विजय शंकरला चार सामन्यात 5 पेक्षा कमी सरासरीने 19 धावाच करता आल्यात. गोलंदाजीतही त्याला चमक दाखवता आली नाही..... विजय शंकरचे आकडे पाहून गुजरातने त्याला घेऊन चूक केली, असेच म्हणावे लागेल.
मनिष पांडे -
यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मनिष पांडेने आपल्या कामगिरीने सर्वांनाच निराश केलाय. मनिष पांडेने सहा सामन्यात 14.67 च्या सरासरीने आणि 80 च्या स्ट्राईक रेटने फक्त 88 धावा केल्या आहेत. मनिष पांडे आतापर्यंत मुंबई इंडियन्स, रॉयल चेलेंजर्स बेंगलोर, पुणे वारियर्स, कोलकाता नाइट राइडर्स, सनराइजर्स हैदराबाद संघासाठी खेळलाय.
जयदेव उनादकट -
वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटने यंदा निराश केलाय. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या जयदेवला कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. त्याला विकेट घेण्यात अपयश आलेच पण धावाही रोखता आल्या नाहीत. पाच सामन्यात जयदेव उनादकटने फक्त सहा विकेट घेतल्या..यादरम्यान त्याने प्रति षटक 9.50 धावा कर्च केल्या...
अजिंक्य रहाणे
कोलकाता नाइट रायडर्सचा सलामी फलंदाज अजिंक्य रहाणे खास कामगिरी करु शकला नाही. त्याला आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. अजिंक्य रहाणेने सहा सामन्यात 17.50 च्या सरासरीने आणि 100.96 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्यात.. अजिंक्य रहाणे मागील काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. कोलकाताआधी रहाणे मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रायजिंग पुणे सुपर जॉयंट्स संघाकडून खेळलाय.