IPL 2022 Mega Auction Players List, Who got whom : बंगळुरु येथे सुरु असलेला लिलाव संपला आहे. दोन दिवसांत 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं आहे. यासाठी फ्रेचायझींनी 5,51,70,00,000 रुपये खर्च केले आहे. 67 विदेशी खेळाडूंना दहा संघात खरेदी करण्यात आले आहे. तर 137 भारतीय खेळाडूंवर बोली लागली. यंदाच्या आयपीएलमध्ये युवा ईशान किशन सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. ईशान किशनसाठी मुंबईने 15.25 कोटी मोजले आहेत. आवेश खान सर्वात महागडा अनकॅप खेळाडू राहिला. लखनौ संघाने आवेश खानला 10 कोटी रुपयांत खरेदी केलं.  पाहूयात लिलावातील सर्वात महागडे खेळाडू...

संघाचे नाव खेळाडूचे नाव संघातील भूमिका किंमत

मुंबई इंडियन्स

ईशान किशन विकटकिपर ₹15,25,00,000

चेन्नई सुपर किग्स

दीपक चाहर गोलंदाज ₹14,00,00,000

कोलकाता नाईट रायडर्स

श्रेयस अय्यर फलंदाज ₹12,25,00,000

पंजाब किंग्स

लियाम लिव्हिंगस्टोन अष्टपैलू ₹11,50,00,000

दिल्ली कॅपिटल

शार्दुल ठाकूर गोलंदाज ₹10,75,00,000

रॉयल चॅलेंजर बेंगलोर

वानंदु हसरंगा अष्टपैलू ₹10,75,00,000

रॉयल चॅलेंजर बेंगलोर

हर्षल पटेल अष्टपैलू ₹10,75,00,000

राजस्थान रॉयल 

 

प्रसिध कृष्णा  गोलंदाज ₹10,00,00,000

सनरायझर्स हैदराबाद

निकोलस पूरन विकेटकिपर ₹10,75,00,000

गुजरात टायटन्स

लॉकी फर्गुसन गोलंदाज ₹10,00,00,000

लखनौ सुपर जायंटस - 

आवेश खान गोलंदाज ₹10,00,00,000

1. ईशान किशनला  (Ishan Kishan) मुंबईने 15.25 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. पहिल्या दिवशी सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.  .

2. वेगवान गोलंदाज दीपक चाहरला (Deepak Chahar)  चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटी रुपयांत परत घेतलं आहे.  

3. श्रेयस अय्यरला कोलकाता संघाने 12.25 कोटी रुपयांत खरेदी केलं.  

4. श्रीलंकाचा अष्टपैलू वानिंदु हसारंगाला (Wanindu Hasaranga) आरसीबीने 10.75 कोटी रुपयांत खरेदी केलं.  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरला आहे.

5. वेस्ट विंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनला (Nicholas Pooran) सनराइजर्स हैदराबादने 10.75 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे.  

6. युवा हर्षल पटेलला आरसीबीने  10.75 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. .

7. अष्टपैलू शार्दुल ठाकुरला 10.75 कोटी रुपयात दिल्लीने खरेदी केलं आहे.  

8. प्रसिध कृष्णाला राजस्थान रॉयल्सने दहा कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. 

9. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनला दहा कोटी रुपयात गुजरातने खरेदी केलं आहे.  

10. आवेश खानला लखनौ संघाने 10 कोटी रुपयात खरेदी केलं आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरला आहे. 

11. राजस्थान रॉयलने प्रसिध कृष्णाला 10 कोटी रुपयात खरेदी केलं.