Deepak Chahar CSK, IPL 2022 Mega Auction : बंगळुरुमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल झाले, तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले. लिलावाच्या तिसऱ्या सत्रात दीपक चाहरवर मोठी बोली लागली आहे. चेन्नईने दीपक चाहरसाठी तब्बल 14 कोटी रुपये मोजले आहेत. दीपक चाहरसाठी चेन्नई, राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद यांच्यामध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अखेरीस चेन्नई सुपर किंग्सने दीपकला 14 कोटी रुपयात खरेदी केलं.  


दीपक चाहर 14 कोटी रुपयांमध्ये पुन्हा एकदा चेन्नईच्या ताफ्यात गेला आहे. यासह आजच्या दिवसातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. चेन्नईने आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी बोली लावली. गेल्या काही दिवसांपासून दीपक चाहर गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल दाखवत आहे. त्यामुळे चाहरला आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ लागली होती. 


हे खेळाडू राहिले अनसोल्ड - 
मोहम्मद नबी, मॅथ्यू वेड, वृद्धीमान साहा, सुरेश रैना, स्टीव स्मिथ,  शाकिब अल हसन आणि डेविड मिलर,  सॅम बिलिंग्स, उमेश यादव पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिले. दुसऱ्या दिवशी अखेरीस या खेळाडूंवर पुन्हा बोली लागणार आहे.  


कोणत्या संघाने कुणाला घेतलं?


1) चेन्नई सुपर किंग्ज- ड्वेन ब्रावो (4.4 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), रॉबिन उथप्पा (2 कोटी),  दीपक चहर (14 कोटी),


2) मुंबई इंडियन्स-  ईशान किशन (15.25 कोटी)


3) दिल्ली कॅपिटल्स- डेविड वार्नर (6.25 कोटी), मिशेल मार्शची (6.50  कोटी), 


4) कोलकाता नाईट रायडर्स- श्रेयस अय्यर (12.25 कोटी), पॅट कमिंस (7.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), 


5) गुजरात टायटन्स- मोहम्मद शामी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी)


6) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- फाफ डू प्लेसीस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75), वानिंदु हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जॉश हेजलवूड (7.5 कोटी)


7) लखनऊ सुपर जायंट्स- मनीष पांडेला (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुड्डा (5.75 कोटी), कृणाल पांड्या (8.75), क्विंटन डी कॉक (6.75)


8) राजस्थान रॉयल्स- आर अश्विन (5 कोटी), ट्रेन्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडीकल (7.50 कोटी),


9) पंजाब किंग्ज- शिखर धवन (8.25 कोटी), कगिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेयरेस्टो (6.75),


10) सनरायझर्स हैदराबाद- वॉशिंन्टन सुंदर ( 8.75 कोटी), निकलस पूरन (10.75 कोटी), टी नजराजन (4 कोटी),