IPL 2025 Winner RCB Prize Money: आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात (IPL 2025 Final RCB vs PBKS), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) 6 धावांनी पराभव करून आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले. आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर बंगळुरुला 20 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर उपविजेता ठरलेल्या पंजाब किंग्सच्या संघाला 14 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. मात्र दोन्ही संघांना मिळणाऱ्या बक्षीसांच्या रकमेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
आरसीबीला किती कर भरावा लागेल?
आयपीएलच्या विजेत्या संघाला पूर्ण रक्कम मिळत नाही, परंतु त्यावर लावलेल्या करानुसार रक्कम मिळते. आरसीबीला आयपीएलच्या बक्षीस रकमेवर लावलेला कर देखील भरावा लागेल. आरसीबीला बक्षीस रकमेच्या 30 टक्के करात भरावे लागतील. त्यानुसार, बंगळुरू संघाला 6 कोटी रुपये कर म्हणून द्यावे लागतील आणि बंगळुरु संघाला बक्षीस रकमेचे 14 कोटी रुपये मिळतील.
पंजाब किंग्सला किती बक्षीस रक्कम मिळाली?
प्रीती झिंटाचा संघ पंजाब किंग्स आयपीएलमध्ये उपविजेता होता. पंजाब किंग्स संघाला 13 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली आहे. यावरही 30 टक्के कर आकारला जाईल, त्यानूसार पंजाब किंग्सच्या संघाला 3.90 कोटी रुपये कर म्हणून भरावे लागतील. त्यामुळे पंजाब किंग्सच्या संघाला बक्षिसाच्या रकमेत 9 कोटी 10 लाख रुपये मिळतील.
आयपीएल 2025 च्या पुरस्कारांची संपूर्ण यादी-
विजेता संघ - आरसीबी 20 कोटीउपविजेता - पंजाब किंग्ज संघ 12.5 कोटीतिसऱ्या स्थानी राहिलेला संघ- मुंबई इंडियन् 7 कोटीचौथ्या स्थानी राहिलेला संघ – गुजरात टायटन्स 6 कोटीअंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच – जितेश शर्मा 1 लाखअंतिम फेरीतील सामनावीर - कृणाल पांड्या 5 लाख रुपयेउदयोन्मुख खेळाडू - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफीपर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट्स) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅपऑरेंज कॅप - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स, 759 धावा) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅपफँटसी किंग ऑफ द सीझन - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफीमोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर(एमव्हीपी) - सूर्यकुमार यादव 15 लाख रुपये आणि ट्रॉफीफेअरप्ले पुरस्कार - चेन्नई सुपर किंग्ज 10 लाख रुपये आणि ट्रॉफीसुपर सिक्स ऑफ द सीझन - निकोलस पूरन (40 षटकार) 10 लाखग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन - मोहम्मद सिराज 10 लाखकॅच ऑफ द सीझन - कामिंदू मेंडिस 10 लाखसुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - 10 लाखफोर ऑफ द सीझन साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) 10 लाखखेळपट्टी आणि मैदान - दिल्ली कॅपिटल्स होम ग्राउंड 50 लाख