IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 च्या स्पर्धेत काल दोन सामने खेळवण्यात आले. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 7 विकेट्सने जिंकला. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारत 9 विकेट्सने चेन्नई सुपर किंग्सला लोळवले. बंगळुरु आणि मुंबईच्या या विजयामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत (IPL 2025 Points Table) मोठे बदल झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ जवळपास आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चेन्नईला पुढील सर्व सामने जिंकावे लागतील. 

गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर-

आयपीएलच्या स्पर्धेत आतापर्यंत 38 सामने खेळवण्यात आले. सध्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर आहे. गुजरातने 7 सामने खेळले असून यामध्ये 5 सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इतर संघांचे देखील 10 गुण आहेत. मात्र नेटरनरेटच्या आधारावर गुजरातने अव्वल स्थान पटकावले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीने आतापर्यंत 7 सामने खेळले असून 5 सामन्यात विजय मिळवला आहे. 

चेन्नई सुपर किंग्स दहाव्या क्रमांकावर-

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ या हंगामात चांगल्या फॉर्मात आहे. बंगळुरुने आतापर्यंत 8 सामने खेळले असून यामध्ये 5 सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुचे सध्या 10 गुण आहेत. तर पंजाब किंग्सचा संघ 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सचे देखील सध्या 10 गुण आहेत. त्यानंतर लखनौ सुपर जायट्सचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. लखनौने 8 सामने खेळले असून यामध्ये 5 सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सहाव्या स्थानावर असून मुंबईने 8 सामन्यात 4 विजय मिळवले आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्स 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स आठव्या, सनरायझर्स हैदराबाद नवव्या आणि चेन्नई सुपर किंग्स दहाव्या क्रमांकावर आहे. 

प्रत्येक संघ 14 सामने खेळणार-

आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने लीगची सुरुवात झाली. 10 संघांच्या या लीगमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. या 10 संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. ग्रुप अ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये मुंबई इंडियन्ससह सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांना स्थान मिळाले आहे. प्रत्येक संघाला 14 सामने खेळायचे आहेत. गट फेरीच्या शेवटी पॉइंट्स टेबलमधील टॉप-४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. टॉप-२ संघांपूर्वी पहिला क्वालिफायर सामना होईल. त्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल. पराभूत संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचेल. यानंतर, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये एलिमिनेटर खेळवला जाईल. पराभूत संघाचा प्रवास यातच संपेल. तर विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये क्वालिफायर-१ च्या पराभूत संघाशी सामना करेल. या सामन्यातील विजेता नंतर अंतिम फेरीत पोहोचेल.

संबंधित बातमी:

MI vs CSK IPL 2025 : वानखेडेवर रोहित शर्माची दादागिरी, मुंबईच्या विजयाची हॅट्रिक, धोनीची चेन्नई IPL मधून बाहेर?