IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 च्या हंगामात काल (17 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 4 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादला 20 षटकात 5 बाद 162 धावांवर रोखल्यानंतर मुंबईने 18.1 षटकात 6 बाद 166 धावा करत बाजी मारली. विल जॅक्सचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला.

मुंबईचा विजय आणि हैदराबादचा पराभव यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेवरही परिणाम झाला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या सातव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. तर चेन्नई सुपर किंग्स दहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 7 सामने खेळले आहेत आणि 2 जिंकले आहेत. 5 सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर-

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यामध्ये 3 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचे 6 गुण आहेत. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. हैदराबाद संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, यामध्ये 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 5 सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादचे सध्या 4 गुण आहेत. 

गुणतालिकेत दिल्ली अन् गुजरातचे वर्चस्व-

दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीने 6 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत. तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचे सध्या 10 गुण आहेत. गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातने 6 सामने खेळले आहेत आणि 4 जिंकले आहेत. गुजरातचे एकूण 8 गुण आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा संघा तिसऱ्या स्थानावर आहे आणि पंजाब किंग्ज चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीने 6 सामने खेळले आहेत आणि 4 जिंकले आहेत.

मुंबईने हैदराबादविरुद्ध विजय नोंदवला -

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईला 163 धावांचे लक्ष्य दिले. यादरम्यान अभिषेक शर्माने 40 धावांची खेळी खेळली. त्याने 28 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकार मारले. क्लासेनने 37 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, मुंबई संघाने 18.1 षटकात लक्ष्य गाठले. त्यासाठी हार्दिक पांड्याने 9 चेंडूत 21 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 15 चेंडूंचा सामना करत 26 धावा केल्या. रोहित शर्माने 26 धावांचे योगदान दिले.

संबंधित बातमी:

IPL 2025 MI vs SRH: ना फलंदाजांना, ना गोलंदाजांना...; पॅट कमिन्सने पराभवानंतर कोणाला धरले जबाबदार?