IPL 2025 MI vs SRH: आयपीएल 2025 च्या हंगामातील 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 4 विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या या परभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सच्या विधानाची चर्चा रंगली आहे. 

पराभवानंतर पॅट कमिन्सने कोणाला जबाबदार धरलं?

मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर पॅट कमिन्सने वानखेडेच्या खेळपट्टीला जबाबदार धरले आहे. ही खूप कठीण खेळपट्टी होती. आम्हाला खेळपट्टी वेगवान असेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही, असं पॅट कमिन्सने सांगितले. मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही 160 धावा केल्या, त्या खूप कमी होत्या. आम्ही देखील चांगली गोलंदाजी केली, मात्र योग्यवेळी विकेट्स घेऊ शकलो नाही, असं पॅट कमिन्सने स्पष्ट केले. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या विल जॅक्सला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. 

इशान किशन आणि नितीश रेड्डी अपयशी-

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 162 धावा केल्या होत्या. यादरम्यान अभिषेक शर्माने 40 धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडने 28 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड मुंबईविरुद्ध आक्रमक फलंदाजी करु शकला नाही. हेडने 29 चेंडूत 28 धावा केल्या. यामध्ये त्याने फक्त 3 चौकार लगावले. तर इशान किशनने फक्त 2 धावा केल्या. नितीश रेड्डी 19 धावा करत बाद झाला. अनिकेत वर्मा 8 चेंडूत 18 धावा करत नाबाद राहिला. तर पॅट कमिन्सने 8 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सची आक्रमक फलंदाजी-

मुंबईच्या फलंदाजीदरम्यान, रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा सलामीला आले. रोहित 16 चेंडूंत 26 धावा करून नाबाद राहिला. रोहित शर्माने कडकडीत 3 षटकार मारले. रिकेल्टनने 31 धावा केल्या. विल जॅक्सने 36 धावांची खेळी खेळली. सूर्यकुमार यादवने 15 चेंडूत 26 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने 9 चेंडूत 21वा केल्या. मुंबईच्या प्रत्येक फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केली.

संबंधित बातमी:

BCCI Central Contract : IPL दरम्यान 3 भारतीय खेळाडूंचे नशीब फळफळणार, BCCI केंद्रीय करारात स्थान मिळण्याची शक्यता, जाणून घ्या कोण बाहेर?