IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात आज (30 मार्च) दोन सामने खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (RR vs CSK) यांच्यात रंगणार आहे. राजस्थान आणि चेन्नईचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल.
गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद कुठे?
दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. त्यासामन्यात, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने 1 विकेटने विजय मिळवला. सध्या दिल्ली कॅपिटल्स पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. पण त्यांना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे, सनरायझर्स हैदराबाद 2 सामन्यांत 2 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्सला हंगामातील पहिला विजय मिळणार?
दरम्यान, राजस्थान रॉयल्स त्यांच्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये तळाला आहे. याशिवाय, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला, पण त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे, चेन्नई सुपर किंग्जचे 2 सामन्यांत 2 गुण आहेत.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.
इम्पॅक्ट खेळाडू - आशुतोष शर्मा.
सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, राहुल चहर, मोहम्मद शमी आणि अॅडम झम्पा.
इम्पॅक्ट खेळाडू-
सचिन बेबी/ अभिनव मनोहर
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीकशन, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, मथिशा पाथिराणा, नूर अहमद आणि खलील अहमद.