IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात केकेआरच्या होम ग्राउंड ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात केकेआरने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली आणि आरसीबीला विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य दिले होते. केकेआरच्या डावादरम्यान, एक अशी घटना घडली ज्यामुळे चाहते थोडे गोंधळले. खरंतर, जेव्हा केकेआरच्या डावाची पहिली षटक सुरू झाली, तेव्हा खाली गोलंदाजाच्या जागी विराट कोहलीचे नाव लिहिलेले दिसले.

विराट कोहलीने टाकली आयपीएल 2025 मध्ये पहिली ओव्हर?  

चाहत्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की जर कोहलीने सामन्यात गोलंदाजी केली नाही, तर पहिल्या षटकात त्याचे नाव स्क्रीनवर कसे दिसले? खरंतर, हे टेक्निकल चुकीमुळे घडलं. जोश हेझलवूडचे नाव दाखवण्याऐवजी त्यांनी कोहलीचे नाव स्क्रीनवर दाखवले. पण, प्रसारकांना त्यांची चूक लवकरच लक्षात आली आणि त्यांनी ती दुरुस्त केली.

केकेआरच्या डावातील पहिले षटक जोश हेझलवूडने टाकले आणि पाचव्या चेंडूवरच धोकादायक फलंदाज क्विंटन डी कॉकला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला आणि स्पर्धेची शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने 7 विकेटच्या मोबदल्यात 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने 16.4 षटकांत केवळ 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. आरसीबीकडून विराट कोहलीने 36 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी केली. त्याच वेळी, फिल सॉल्टने 31 चेंडूत 56 धावांचे योगदान दिले. कर्णधार रजत पाटीदारने 16 चेंडूत 34 धावा केल्या.

देवदत्त पडिकलने 10 धावा आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 15 धावांचे योगदान दिले. तर केकेआरसाठी वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हे ही वाचा - 

Sunil Narine Out or Not Out : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चीटिंग? सुनील नरेनने स्टंपवर बॅट मारली तरी नॉट आउट; जाणून घ्या काय सांगतो नियम?

KKR vs RCB IPL 2025 : आधी कृणाल पांड्या, नंतर विराट-सॉल्टचा धमाका! पहिल्या सामन्यात आरसीबीने उडवला केकेआरचा धुव्वा