KKR vs RCB, Ajinkya Rahane Fifty : इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि पहिल्या षटकात तो निर्णय कुठेतरी योग्य ठरला. कारण पहिल्याच षटकात सलामीवीर क्विंटन डी कॉक पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रहाणे आणि नरेन यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.
आयपीएल 2025 मधील पहिले अर्धशतक कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीने झळकले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने फक्त 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सुयश शर्माने टाकलेल्या नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केकेआर संघाची सुरुवात चांगली झाली नाही. क्विंटन डी कॉक (04) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याला जोश हेझलवूडने आऊट केले. यानंतर, अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि येताच त्याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सुयश शर्माने टाकलेल्या नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
अजिंक्य रहाणेने पॉवरप्लेमध्ये 16 चेंडूत केल्या 39 धावा
अजिंक्य रहाणेने पॉवरप्लेमध्ये फक्त 16 चेंडूत 39 धावा केल्या होत्या. त्याने चौथ्या षटकात चौकार मारून आपले खाते उघडले. यानंतर, रसिक सलामच्या या षटकात त्याने २ षटकार मारले. कृणाल पंड्याने टाकलेल्या पाचव्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर रहाणेने दोन चौकार मारले. आरसीबीकडून यश दयाल सहावे षटक करण्यासाठी आला, या षटकात कर्णधार रहाणेने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. अजिंक्य रहाणेने सुनील नरेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली.
कोलकात्याला 4 चेंडूत दोन मोठे धक्के बसले. दोन्ही सेट फलंदाज आऊट झाले. आधी सुनील नरेन 26 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रूपाने कोलकाताने तिसरी विकेट गमावली. तो 31 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. या खेळीत अजिंक्य रहाणेने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. 11 षटकांनंतर धावसंख्या 110/3 आहे.
हे ही वाचा -