अहमदाबाद : आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये एलिमिनेटरची लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडली. अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) पराभूत केलं. सलग सहा विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील बंगळुरुचा पराभव झाला. या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं. राजस्थान रॉयल्सनं बंगळुरुवर विजय मिळवून क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. आता राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात 24 मे रोजी चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर क्वालिफायर-2 ची लढत होणार आहे. या लढतीमधील विजेता संघ अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स विरोधात लढेल. विराट कोहलीनं (Virat Kohli) यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहली भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.


राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तोंदलन केलं. यावेळी विराट कोहलीनं देखील खेळाडूंची भेट घेतल्यानंतर तो शांतपणे स्टम्पजवळ गेला. विराट कोहलीनं त्या स्टम्पवरील बेल्स हातानं खाली पाडल्या. विराट कोहलीचा हा व्हिडीओ आयपीएलकडून शेअर करण्यात आला आहे. 


पाहा व्हिडीओ : 






राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंसोबत विराट कोहलीनं हस्तोंदलन केलं. यानंतर आयपीएलमधून निवृत्त होत असलेल्या दिनेश कार्तिकला विराटनं मिठी मारली आणि तो स्टम्प जवळ गेला आणि त्यानं बेल्स उडवल्या.  विराट कोहलीनं एलिमिनेटरमध्ये बंगळुरुला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. विराटनं एक षटकार आणि तीन चौकारासह  24 बॉलमध्ये 33 धावा केल्या. 


विराट कोहलीनं आयपीएलमध्ये 8 हजार धावांची नोंद केली आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलंडणारा पहिला खेळाडू टरला आहे. विराटनं आयपीएलमधील  15 धावांमध्ये 741 धावा केल्या आहेत. विराटनं एक शतक आणि पाच अर्धशतकं केली आहेत. विराटनं  154.70 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. 


ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या नावावर


बंगळुरुचा संघ जरी आयपीएलमधून बाहेर  गेलेला असला तरी ऑरेंज कॅप त्याच्याकडे राहण्याची शक्यता आहे. विराटच्या नावावर 741 धावा आहेत. चेन्नई  सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड दुसऱ्या स्थानावर आहे. तर, रियान पराग तिसऱ्या स्थानावर असून त्यानं 13 मॅचमध्ये 567 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड चौथ्या स्थानावर असून 13 मॅचमध्ये 533 धावा केल्या आहेत. यानंतर पाचव्या स्थानी संजू सॅमसन असून त्यांन 521 धावा केल्या आहेत.


संबंधित बातम्या : 



राजस्थानचा 4 विकेटने रॉयल विजय, आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपलं, चेन्नईमध्ये SRH vs RR चा सामना