IPL 2024 नवी दिल्ली: एकदिवसीय क्रिकेट असो की टी-20 क्रिकेट असो भारताचा माजी कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावाची चर्चा सर्वत्र असते. सध्या सर्वत्र आयपीएलची (IPL 2024) चर्चा आहे. विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 6 धावा करताच टी 20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीला आक्रमक फलदाज म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीला आयपीएलमध्ये खेळणारा दुसरा खेळाडू टक्कर देत आहे. त्या खेळाडूचं नाव दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) असं आहे.  


विराट कोहली प्रमाणं ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं देखील टी -20  क्रिकेटमध्ये  12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीनं आतापर्यंत 380 टी-20 मॅचमध्ये 12197 धावा केल्या आहेत. दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरनं 374 मॅचमध्ये 12213 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर विराट कोहलीपेक्षा 16 धावांनी पुढं आहे. सध्या दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. यामुळं आगामी काळात या दोन्ही खेळांडूमध्ये कोण पुढं जाणार हे पाहावं लागणार आहे.  


विराट कोहलीची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिलेली आहे. विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये 4 मॅचमध्ये 203 धावा केल्या आहेत. दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरनं देखील यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीसाठी 148 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं एक मोठी खेळी केल्यास तो डेव्हिड वॉर्नरला मागं टाकू शकतो. सध्या दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहली की डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरणार हे पाहावं लागेल.  


आरसीबी कमबॅक करणार?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची यंदाच्या आयपीएलची सुरुवात चांगली झालेली नाही.  फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील आरसीबी सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे.  आरसीबीनं आतापर्यंत चार मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये आरसीबीला एका मॅचमध्ये विजय मिळाला आहे. तर, तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये  चार मॅचमध्ये 203 धावा केल्या आहेत. दुसरीकडे आरसीबीचे इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले आहेत. कर्णधार फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदार चांगली कामगिरी करु शकले नाहीत. आजच्या मॅचमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार यांना चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या हंगामातील तीन मॅच जिंकत गुणतालिकेत 6 गुणासंह तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. राजस्थानला देखील काही फलंदाजांच्या फॉर्मची चिंता आहे.   


संबंधित बातम्या :


हार्दिक पांड्यासाठी अखेर दादा मैदानात उतरला, सौरव गांगुली रोहित शर्माविषयी म्हणाला...

 

अभिषेक शर्माची स्फोटक फलंदाजी, एक चूक भोवली, युवराज सिंगनं फटकारलं, कारण..