IPL Points Table बंगळुरु : आयपीएलच्या (IPL 2024) सहा मॅचनंतर  गुणतालिकेत उलटफेर झाले आहेत. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात मॅच पार पडली. आरसीबीनं ही मॅच चार विकेटनं जिंकली. आरसीबीला या हंगामातील पहिला विजय मिळाला. आयपीएलच्या पहिल्या सहा मॅचेस पाहिल्या तर ज्या टीमच्या होम ग्राऊंडवर मॅच असेल त्या टीमनं विजय मिळवला आहे. पंजाब विरुद्धच्या विजयानंतर आरसीबीनं गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. सद्यस्थितीत राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानी असून चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.  


आरसीबीच्या विजयानं गुणतालिकेत काय फरक पडला? 


राजस्थान रॉयल्स एका मॅचमधील विजयासह नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. ईडन गार्डन्सनवर सनरायजर्स हैदराबादला पराभूत करणारा संघ कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या स्थानी आहे. पंजाब किंग्ज पाचव्या तर आरसीबी सहाव्या स्थानावर आहे. सर्व संघांचे गुण २ आहेत. मात्र, नेट रनरेटच्या जोरावर रँकिंग ठरलं आहे. सातव्या स्थानी सनरायजर्स हैदराबाद, आठव्या स्थानी मुंबई इंडियन्स, नवव्या स्थानी दिल्ली कॅपिटल्स आणि दहाव्या स्थानी लखनऊ सुपर जाएंटस आहे. गुणतालिकेतील पहिले चार संघ प्लेऑफ मध्ये क्वालिफाय करतील.  


ऑरेंज कॅप कुणाकडे?


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी असतो. आरसीबीच्या दोन मॅच झालेल्या असून विराट कोहली सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आह. विराटनं  एका अर्धशतकासह 98 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी पंजाबचा सॅम करन आणि तिसऱ्या स्थानी राजस्थानचा कॅप्टनं संजू सॅमसन आहे. 


पर्पल कॅपचा मानकरी


आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅपचा मानकरी ठरवलं जातं.  चेन्नई सुपर किंग्जचा मुस्तफिजूर रहमान पहिल्या स्थानावर असल्यानं तो मानकरी आहे. त्यानं चार विकेट घेतल्य आहेत. आज चेन्नई आणि गुजरात यांच्यात मॅच होणार असल्यानं त्याचं अव्वल स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी तर हरप्रीत ब्रार तिसऱ्या स्थानी आहे. 


आरसीबीचा पहिला विजय


आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं कबमॅक केलं आहे . आरसीबीनं चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जला 4 विकेटनं पराभूत केलं.फाफ डु प्लेसिसच्या टीमनं 19.2 ओव्हर्समध्येच  6 विकेट गमावून 176 धावांचा यशस्वी पाठलाग केला. दिनेश कार्तिकनं अखेरच्या  10 बॉलमध्ये 28 धावा करुन आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.


आरसीबीनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय केला होता. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या  पंजाब किंग्जनं 6 विकेटवर 176 धावा केल्या होत्या. पंजाबकडून प्रथम फलंदाजी करताना शिखर धवननं  37 बॉलमध्ये 45 धावा केल्या होत्या  


संबंधित बातम्या :


Shikhar Dhawan : विराटला जीवदान ही चूक, शिखर धवनने पराभवाचं खापर बेअयरस्टोवर फोडलं, टर्निंग पॉइंट सांगत म्हणाला...


Virat Kohli Video Calls : आरसीबीचा होम ग्राऊंडवर पहिला विजय, विराट कोहलीचं घरच्यांसोबत सेलिब्रेशन, अनुष्का शर्मासह मुलांना व्हिडीओ कॉल