बंगलुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मॅच होणार आहे. फाफ डु प्लेसिस याच्या नेतृत्त्वातील आरसीबी आणि श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील केकेआर यांच्यातील सामन्याकडे क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघांकडे आजच्या विजयासह गुणतालिकत वरचा क्रमांक मिळवण्याची संधी आहे. आरसीबीनं आतापर्यंत दोन मॅच खेळल्या आहेत. तर, कोलकाता नाईट रायडर्सनं एक मॅच खेळली आहे.
आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियवर सलग दुसरी मॅच होत आहे. यापूर्वी आरसीबीनं पंजाब किंग्ज विरुद्ध विजय मिळवला होता. आरसीबीनं अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्जला चार विकेटनं पराभूत केलं होतं.विराट कोहलीनं त्यावेळी 77 धावांची खेळी केली होती. दिनेश कार्तिकनं अखेरच्या दोन ओव्हर्सध्ये 28 धावांची खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला होता.
कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं होतं. कोलकातानं पहिल्या मॅचमध्ये 208 धावा केल्या होत्या. केकेआरनं ती मॅच चार धावांनी जिंकली होती. आरसीबी आणि केकेआरमध्ये यापूर्वी 2021 ते 2023 मध्ये आयपीएलमधील 5 मॅचमध्ये केकेआरनं विजय मिळवला होता.
आरसीबी यापूर्वीच्या पराभवाचा बदल घेणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गेल्या पाच मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवता आलेला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदा आमने सामने येत आहेत. आजच्या मॅचमध्ये रॉयल चलेंजर्स बंगळुरु हा इतिहास पुसून टाकत विजय मिळवणार का हे पाहावं लागले. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स 32 वेळा आमने सामने आले आहेत. कोलकातानं आरसीबीवर 18 वेळा विजय मिळवला आहे. तर आरसीबीनं 14 मॅचमध्ये कोलकाताचा पराभव केला आहे.
आरसीबी यंदा पहिलं विजेतेपद पटकावणार का?
आरसीबीला आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यंदा तरी आयपीएलचं विजेतेपद आरसीबीला मिळणार का हे पाहावं लागेल.
आरसीबीची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार) रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरर, रीस टूली, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा
कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य टीम
फिल साल्ट, सुनील नरेन, नितीश राणा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग,रमनदीप सिंग, आंद्रे रस्सेल, मिशेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा
संबंधित बातम्या :
IPL 2024 : आयपीएलमध्ये कोलकाता आणि बंगळुरुमध्ये टक्कर होणार, हे खेळाडू ठरतील गेमचेंजर
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? जाणून घ्या