IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात काल सामना खेळला गेला. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने बाजी मारली. बंगळुरुने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. विराट कोहलीने (Virat Kohli) चांगली कामगिरी करत 42 धावांची खेळी खेळली. या खेळीत विराट कोहलीने 2 चौकार आणि 4 षटकार टोलावले. तसेच या खेळीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप पटकावली आहे.
विराट कोहलीच्या या खेळीची चर्चा होत असताना या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये विराट कोहलीने गुजरात संघाचा विकेटकीपर रिद्धिमान साहा याला शिवी दिल्याचे दिसून येत आहे. आरसीबीच्या फलंदाजी सुरु असताना विराट कोहली मैदानात होता. यावेळी रिद्धिमान साहा गुजरातच्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना, 'चला-चला धावा थांबवा..सामना खेचा...', असं बोलला. यानंतर 'अरे असं कसं सामना खेचणार...xxxx' असं विराट कोहली म्हणाला. विराट कोहलीने मस्तीत ही शिवी दिली.
विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप- (Viraj Kohli Orange Cap)
कोहलीकडे सध्या आयपीएल 2024 ची ऑरेंज कॅप आहे. त्याने 11 सामन्यात 542 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके केली आहेत. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 113 धावा. या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या कर्णधाराने ऋतुराजने 10 सामन्यात 509 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.
गुजरातचा डाव अवघ्या 147 धावांवर गुंडाळला-
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव 19.3 षटकांत सर्वबाद 147 धावांवर आटोपला. गुजरात टायटन्सकडून शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या. याशिवाय राहुल तेवतियाने 35 आणि डेव्हिड मिलरने 30 धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजशिवाय यश दयाल आणि विजयकुमार वशाक यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. करण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.