SRH vs RR Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये शुक्रवारी क्वालिफायर 2 सामना होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर  दोन्ही संघ आमनेसामने असतील. विजेता संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे, तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये हैदराबादचा पराभव झाला होता, तर एलिमेनटर सामन्यात राजस्थानने आरसीबीचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. SRH vs RR  यांच्यामध्ये 26 मे रोजी आमनासामना होणार आहे.  


चेन्नईची खेळपट्टी कशी असेल ?


हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे, या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊसही पडतो. चेन्नईच्या मैदानावर आतापर्यंत सर्वाधिक 200 धावांचा स्कोर झालाय.  सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्मात आहेत. दुसऱ्या क्वालिफायर-2 सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.   


SRH vs RR हेड टू हेड 


सनरायइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये काटें की टक्कर झाली आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत 19 वेळा भिडले आहेत. सर्व सामने रंगतदार झाले आहेत. सनरायजर्स हैदरादाबने 10 वेळा विजय मिळवलाय, तर राजस्थानला नऊ सामन्यात विजय मिळाला आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान आणि हैदराबाद यांच्यामध्ये फक्त एकवेळा सामना झालाय. ज्यामध्ये हैदराबादने विजय मिळवलाय. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचा पाऊस पाडला होता. धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 200 धावांपर्यत मजल मारली होती. हैदराबादने फक्त एका धावेनं सामना जिंकला होता. आता हिशोब चुकता करण्यासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरलाय. 


सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11 :


ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शहबाज अहमद, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकान्त, वियसकांत, टी नटराजन


इम्पॅक्ट प्लेअर -  उमरान मलिक


राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11 :


संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जायसवाल, टॉम कोहलर-केडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युजवेंद्र चहल 


इम्पॅक्ट प्लेअर - शिमरोन हेटमायर